युवा प्रतिजंग दिवाळी अंकाचे प्रकाशन राजेश्वर निटूरे यांच्या हस्ते संपन्न

युवा प्रतिजंग दिवाळी अंकाचे प्रकाशन राजेश्वर निटूरे यांच्या हस्ते संपन्न

उदगीर (प्रतिनिधी) : उदगीर येथील निर्भीड आणि निपक्षपाती पत्रकारितेचे प्रतीक म्हणून ओळखले जाणारे युवा प्रतिजंग या साप्ताहिकाचा दिवाळी अंक काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी नगराध्यक्ष राजेश्वरजी नीटुरे यांच्या हस्ते तसेच काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष कल्याणराव पाटील, ज्येष्ठ पत्रकार एल पी उगिले, मराठी पत्रकार परिषद मुंबईचे लातूर विभागीय सचिव सचिन शिवशेट्टे, ज्येष्ठ पत्रकार अंबादास आलमखाने, वेंकटराव बोईनवाड, संदीप निडवदे, प्रेस फोटोग्राफर अशोक तोंडारे उर्फ टाटा यांच्यासह संपादक महेश कुमार मठपती इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

पत्रकारांनी स्पष्ट आणि सत्य लिखाणावर भर द्यावा. पत्रकारिता हा समाजाचा आरसा ठरावा. अशी अपेक्षा याप्रसंगी राजेश्वरजी नीटुरे यांनी व्यक्त केली.

About The Author

error: Content is protected !!