रिक्षा कल्याणकारी मंडळाची अंमलबजावणी करा
रिक्षा चालकांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र
प्रति,
मा.श्री. एकनाथजी शिंदे साहेब,
मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य, मुंबई.
महोदय,
सनविवि पत्रास कारण की, प्रथमतः आमच्या ऑटो व्यवसायातील एक रिक्षा चालक या राज्याच्या मुख्यमंत्री पदी विराजमान झाल्याबद्दल मनपूर्वक हार्दिक अभिनंदन.
तत्कालिन फडणवीस सरकारने शिक्षा कल्याणकारी मंडळाची घोषणा करून 5 कोटी रुपयांची तरतुद केली. पण प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी मात्र केलेली नाही.
म्हणून मा.साहेबांनी रिक्षा कल्याणकारी मंडळाची अमलबजावणी करुन राज्यातील तमाम रिक्षा चालकांस न्याय द्यावा. अशा आशयाचे पत्र तमाम रिक्षा चालकांनी लिखित स्वरूपात लिहून टपाल व्दारे मुख्यमंत्री यांना पाठवले आहे.
यावेळी सुरेश भाऊ शिंदे, मच्छिंद्र कांबळे, वसंतराव ढमाले, हरिभाऊ गायकवाड, अन्वर भाई पठाण, पवार उमाकांत, वामनराव जाधव तसेच आदी रिक्षा चालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.