घरफोड्या करणाऱ्या सराईत गुन्हेगारांना अटक.चोरीचे 03 गुन्हे उघड. सोन्या चांदीचे दागिने सह 2 लाख 68 हजार रुपयाच्या मुद्देमाल जप्त

घरफोड्या करणाऱ्या सराईत गुन्हेगारांना अटक.चोरीचे 03 गुन्हे उघड. सोन्या चांदीचे दागिने सह 2 लाख 68 हजार रुपयाच्या मुद्देमाल जप्त

लातूर (एल.पी.उगीले) : ऐन दिवाळीच्या सुमारास आणि तत्पूर्वी ही चोऱ्या, घरफोड्या करून चोरट्यांनी नागरिकांच्या नाकी नऊ आणले होते. दरम्यान लातूर जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांची गोंदिया येथे बदली झाली. आणि त्यांच्या ठिकाणी गुन्हेगारांचे कर्दनकाळ म्हणून परिचित असलेले जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे हे दाखल झाले. नवीन जिल्हा पोलीस अधीक्षक यायला आणि चोऱ्या, घरफोड्या वाढल्या. सुट्टीचे दिवस असल्याने अनेक जण घराला कुलपे लावून बाहेरगावी गेल्याने चोरट्यांचे फावले होते, मात्र चोऱ्या वाढल्यामुळे सर्वसामान्य नागरिक पोलिसांच्या नावाने बोटे मोडत होते, त्यामुळे पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी लातूर जिल्ह्यामध्ये घडणारे चोरी व घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणण्याकरिता आदेशित व निर्देशित केले होते. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक अनुराग जैन,उपविभागीय पोलीस अधिकारी लातूर शहर जितेंद्र जगदाळे यांचे मार्गदर्शनात व स्थानिक गुन्हे शाखे चे पोलीस निरीक्षक गजानन भातलवंडे यांचे नेतृत्वात स्थानिक गुन्हेचे विविध पथके तयार करून जिल्ह्यात घडलेल्या घरफोड्या संदर्भाने तपास करण्यात येत होता.
त्या अनुषंगाने दिनांक 04/11/2022 संध्याकाळच्या सुमारास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मिळालेल्या गोपनिय माहितीच्या आधारावर पोलीस रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार
विजय बब्रू भोसले(,वय 24 वर्ष,रा. घाटशीळ रोड, पाण्याच्या टाकीजवळ, तुळजापूर ),शिवमणी संतोष भोसले( वय 20 वर्ष, रा. जनवडा बिदर, कर्नाटक, सध्या रा. निलंगा), अजय व्यंकट शिंदे, (वय 19 वर्ष, रा. सुगाव तालुका चाकूर जिल्हा लातूर), तसेच एक विधी संघर्ष ग्रस्त बालक यांना ताब्यात घेऊन त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी आपण केलेल्या गुन्ह्याचा पाढा वाचला यामध्ये प्रामुख्याने,
पोलीस ठाणे शिवाजीनगर येथील
गुन्हा क्रमांक 439/2022, कलम 454, 457, 380 भा.द .वि. तसेच पोलीस ठाणे शिवाजीनगर गुन्हा क्रमांक 441/2022, कलम 457, 380 भा.द.वि. आणि पोलीस ठाणे एमआयडीसी गुन्हा क्रमांक रजि. क्र. 596/2022 कलम 454, 457, 380 भा.द.वी. गुन्ह्यात चोरी केल्याचे कबूल केले. हे गुन्हे आपण व त्यांच्या इतर साथीदारासह केल्याचे कबूल करून नमूद गुन्ह्यात चोरलेला सोने-चांदीचा दागिन्याचा 2 लाख 68 हजार रुपयांचा मुद्देमाल त्यांच्याकडून जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे. उर्वरित फरार आरोपींचा शोध स्थानिक गुन्हे शाखेचे पथक घेत असून पुढील तपास शिवाजीनगर व एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी करीत आहेत.
सदरची कामगिरी वरिष्ठांचे मार्गदर्शनात व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन भातलवंडे यांचे नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखा लातूर येथील सपोनी राहुल बहुरे , सचिन द्रोणाचार्य, पोलीस उपनिरीक्षक शैलेश जाधव ,पोलीस अंमलदार अंगद कोतवाड ,राजू मस्के, राम गवारे ,सुधीर कोळसुरे, नितीन कटारे, सिद्धेश्वर जाधव ,प्रदीप चोपणे ,प्रमोद तरडे, नुकुल पाटील यांनी बजावली आहे.

About The Author

error: Content is protected !!