शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) ची विजयी सलामी – कैलास पाटील
उदगीर (एल.पी.उगीले) : अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) च्या अधिकृत उमेदवार ऋतुजाताई रमेश लटके यांचा दणदणीत विजय झाला आहे. एका अर्थाने शिवसेनेची ही विजयी सलामी असून महाराष्ट्रात मशाल चांगली पेटलेली आहे. हेच दाखवून दिले आहे. असे म्हणत शिवसेनेचे उदगीर तालुकाप्रमुख कैलास पाटील आणि इतर शिवसैनिकांनी उदगीर शहरात छत्रपती शिवाजी महाराज चौकात फटाके फोडून तसेच पेढे वाटून आनंद उत्सव साजरा केला.
याप्रसंगी शिवसेनेचे तालुकाप्रमुख कैलास पाटील यांच्यासोबत उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती तथा काँग्रेसचे नेते रामराव मामा बिरादार येनकीकर, शिवसेनेचे तालुका संघटक बालाजी पुरी, माजी उपजिल्हाप्रमुख रामचंद्र आदावळे, विधानसभा प्रमुख श्रीमंत दादा सोनाळे, महिला आघाडीच्या तालुका संघटक अरुणाताई लेंडाने ,प्रा. दत्ता मोरे, बंशीलालजी कांबळे, सुरेश गर्जे, व्यंकट साबणे, गोविंद अण्णा बेंबडे, शिवकांत चटनाळे, अरुण बिरादार, रामभाऊ ठाकूर, शरद भैय्या सावरे, विष्णुकांत चिंतलवार, चौधरी साहेब, महेश फुले, अजय नागापल्ले, रोहित बोईनवाड इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना कैलास पाटील यांनी स्पष्ट केले की, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षाच्या महाआघाडीने ही निवडणूक मोठ्या फरकाने जिंकली आहे. या निवडणुकात भाजपचा उमेदवार प्रत्यक्षरीत्या नसला तरी भाजपाच्या अनेकांनी नोटाला मतदान करण्याचा प्रचार केल्याचे सांगितले जात आहे. काही असले तरी मशाल चिन्हाने आपले अस्तित्व दाखवत, मोठा विजय संपादन केल्याबद्दल अंधेरी विधानसभा मतदारसंघातील सर्व मतदारांचे आभारही कैलास पाटील यांनी व्यक्त केले आहेत.