कर्नाटकचे कॅबिनेट मंत्री ना.प्रभु चव्हाण यांची समर्पण करीअर इन्स्टिट्युटला सदिच्छा भेट

कर्नाटकचे कॅबिनेट मंत्री ना.प्रभु चव्हाण यांची समर्पण करीअर इन्स्टिट्युटला सदिच्छा भेट

उदगीर (एल.पी.उगीले) : कर्नाटक राज्याचे विद्यमान कॅबिनेट मंत्री पशुसंवर्धन, यादगिर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा सीमाभागातील औराद-कमलनगर तालुक्यात सलग तीन वेळा निवडूण येवून मतदार संघाचा कायापालट करणारे, कार्यसम्राट आमदार, ना. प्रभुजी चव्हाण हे पुर्व नियोजित कार्यक्रमासाठी उदगीर येथे आले असता, त्यांनी सीमाभागातील सामाजिक व राजकीय क्षेत्रातील सुपरिचित व्यक्तिमत्त्व, जन सामान्यांचे कैवारी, वारकरी घरण्यातील कै. प्रभुराव गोविंदराव पाटील अकनापुर यांच्या मुलाचा क्लास आहे, म्हणून आवर्जुन ना. मंत्री प्रभु चव्हाण यांनी उदगीर येथील विद्यार्थ्यांच्या उज्वल भवितव्यसाठी समर्पित असलेल्या प्रा. अविनाश प्रभुराव पाटील सरांच्या समर्पण करीअर इन्स्टिट्युट उदगीर ला सदिच्छा भेट दिली. यावेळी साहेबांनी समर्पणच्या निकालाचा आढावा घेवून कौतुक केले, व समर्पण च्या पुढील वाटचालीस शुभेच्छा आणि आशीर्वाद दिले.

यावेळी युवानेते प्रतिक प्रभु चव्हाण, भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश सचिव अमोल निडवदे, औराद भाजपा तालुकाध्यक्ष रामशेट्टी पन्हाळे, भाजपा तालुका उपाध्यक्ष राजू शेळके, संजिव मुर्के, पंडित पाटील, योगेश पाटील, विलास गुरुजी, शुभम पाटील, डॉ. बाळासाहेब पाटील, दिगंबर कुमठे, सुजित राठोड, व्यंकटेश कणसे, राजकुमार पंचडे, अविनाश पाटील, देविदास पाटील, प्रशांत कुमठे तसेच समर्पण करीअर इन्स्टिट्युट चे संचालक सुनील यशवंतराव ढगे, पांडुरंग बालाजी फड, विकास प्रभुराव पाटील, प्रविण रामराव पाटील हे उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!