गावचे सुपुत्र लेफ्टनंट दुष्यंत राठोड यांच्या सेवापुर्ती निमित्त सत्कार सोहळा

गावचे सुपुत्र लेफ्टनंट दुष्यंत राठोड यांच्या सेवापुर्ती निमित्त सत्कार सोहळा

राठोडवाडी (एल.पी.उगीले) : राठोडवाडी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अखरगा येथील भारतीय सैन्यामध्ये लेफ्टनंट पदावर कार्यरत राहून उत्कृष्ट कार्य करणाऱ्या “दुष्यंत पोमा राठोड” यांच्या सेवापूर्तीच्या निमित्ताने गावातून भव्य मिरवणूक काढून त्यांचा सत्कार करण्यात आला.
या गौरव सोहळ्यासाठी कर्नाटक राज्याचे कॅबिनेट मंत्री प्रभुजी चव्हाण उद्घाटक म्हणून उपस्थित होते. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सामाजिक जाणीव जपणारे आ. डॉ. तुषार राठोड, माजी आ. कर्मवीर किसनराव राठोड, शेषराव चव्हाण, देविदास भाऊ राठोड, प्रफुल्ल राठोड, प्रतीक प्रभू चव्हाण, गौतम काळे, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष संतोष भाऊ राठोड, उमरखेड उपजिल्हाधिकारी वेंकट राठोड, डॉक्टर नानासाहेब जाधव, श्रीनिवास नानासाहेब जाधव, व्यंकटराव लोहबंदे, माधव राठोड, रामराव मस्‍कले, डॉ. उमेश पाटील, प्रा. डी बी चव्हाण, आखरगा गावाचे सरपंच प्रतिनिधी संदीप काळे, कल्याणराव पाटील, श्रीराम पाटील, डी एस गोपनर इत्यादी प्रमुख ग्रामस्थ व पदाधिकारी तसेच या गावातील महिला व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे नियोजन समस्त पवार व राठोड परिवार आणि गावकरी मंडळींनी केले होते. आपल्या गावातील सुपुत्र देश पातळीवर गावाचे नावलौकिक गाजवतो, आणि यशस्वी सेवा पूर्ण करून परत येतो. या गोष्टीचा आनंद संपूर्ण ग्रामस्थांना होत असून या सेवापूर्तीच्या निमित्ताने छत्रपती अकॅडमी च्या वतीने रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. तर प्रा. डुमणे व आखरगा गावच्या जनतेच्या आग्रहाखातर त्यांची भव्य दिव्य मिरवणूक काढून मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सत्कार आणि गौरव करण्यात आला.

About The Author