सौ.श्रद्धा जगताप यांना “सावित्रीची लेक” हा पुरस्कार जाहीर

सौ.श्रद्धा जगताप यांना "सावित्रीची लेक" हा पुरस्कार जाहीर

उदगीर (एल. पी. उगिले) : उदगीर येथील सामाजिक कार्यकर्त्या तथा भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा सरचिटणीस सौ. श्रद्धा संजय जगताप (ज्ञाते) यांना नवी दिल्ली येथील लोकशाहीर जनकल्याण सेवा समितीच्या वतीने दिला जाणारा अत्यंत सन्मानाचा पुरस्कार नुकताच जाहीर झाला आहे.
देशभरातून शैक्षणिक, कला, क्रीडा, सांस्कृतिक, सामाजिक, राजकीय, प्रशासकीय क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांना सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या निमित्ताने 3 जानेवारी रोजी “सावित्रीच्या लेकी” हा पुरस्कार दिला जातो.
लोकशाहीर जनकल्याण सेवा समिती नवी दिल्ली यांनी सौ. श्रद्धा जगताप यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना या समाजकार्यासाठी प्रोत्साहन मिळावे, आणि त्यांच्या हातून गोरगरिबांची, शोषित, उपेक्षित, कष्टकऱ्यांची सेवा घडावी. या उदात्त हेतूने त्यांना प्रेरणा देण्यासाठी हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. अशी माहिती संयोजन समितीच्या वतीने कळविण्यात आली आहे.
हा पुरस्कार जाहीर होताच अनेक समाजसेवकांच्या आणि राजकीय, शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडाविषयक क्षेत्रातील जाणकारांनी श्रद्धा जगताप यांचे अभिनंदन करून त्यांचा सत्कार करायला सुरुवात केली आहे. तसेच भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

About The Author

error: Content is protected !!