विलास सहकारी साखर कारखाना युनिट -२ या ठिकाणी टिपलंर द्वारे ऊस उतरणीचा शुभारंभ!
उदगीर (एल.पी.उगीले) : मराठवाड्यात सर्वाधिक भाव देणाऱ्या विलास सहकारी साखर कारखाना युनिट -२ तोंडार ता. उदगीर येथे ऊस तोडणी यंत्राद्वारे तोडणी करण्यात आलेल्या ऊस उतरण्यासाठी नवीनच बांधकाम करण्यात आलेले टिपलर चे पूजन करून ऊस उतरण्याची सुरुवात कार्यकारी संचालक आत्माराम पवार यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आली. यावेळी शेतकी अधिकारी श्रीराम पाटील ,सिव्हिल इंजिनिअर सुनील देशमुख, डिस्टिलरी मॅनेजर संयदूर शेख, ईडीपी इन्चार्ज हरी पिंपळे, केनियार्ड सुपरवाझर सुभाष चव्हाण,व ऊस तोडणी यंत्र ठेकेदार परमेश्वर मोरे भाकसखेडकर, ट्रक्टर चालक अशपाक शेख यांच्यासह अनेक कर्मचारी व वाहन चालक उपस्थित होते.
विलास सहकारी साखर कारखाना येथे प्रथमच ऊस तोडणी यंत्राद्वारे तोडणी केलेला ऊस उतरण्याची व्यवस्था केली आहे. विशेष करून या परिसरातील भाकसखेडा येथील शेतकरी सत्यविजय नामदेवराव जाधव यांचा ऊस सर्वप्रथम उतरवण्यात आला.