स्वामी दयानंद विद्यालयात जागतिक महिला दिन साजरा

स्वामी दयानंद विद्यालयात जागतिक महिला दिन साजरा

लातूर (प्रतिनिधी) : लातूर तालुक्यातील कव्हा येथे जेएसपीएम संचलित स्वामी दयानंद विद्यालयामध्ये माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांच्याहस्ते शाळेतील सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका अरूणा कांदे, माजी प.स.सदस्या दिपमाला मस्के, कव्हा ग्रामपंचायतीचे उपसरपंच किशोर घार, नेताजी मस्के, शिवशरण थंबा, गोविंद सोदले, सारगे गोपाळ,होळकर कमलाकर, सदाशिव सारगे, बाळासाहेब जाधव, विज्ञान शिक्षक देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी शालेय विद्यार्थीनिने सावित्रीबाई फुले यांचा वेश परिधान केलेला होता. त्यांनी आलेल्या पाहुण्यांचे टाळ्या वाजवून स्वागत केले. यावेळी कदम, मानकरी, धामणगावे, मोकाशे, अक्‍कलदिवे, थंबा, शिवाजी घार यांच्यासह शिक्षक, शिक्षेकेत्तर कर्मचारी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

About The Author

error: Content is protected !!