राज्याला विकासाच्या वाटेवर घेवून जाणारा अर्थसंकल्प – दिलीपराव देशमुख

राज्याला विकासाच्या वाटेवर घेवून जाणारा अर्थसंकल्प - दिलीपराव देशमुख

लातूर (प्रतिनिधी) : राज्यातील महाराष्ट्र विकास आघाडी सरकारचा दुसरा अर्थसंकल्प २०२१ सादर झाला असून

कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील आरोग्य सेवेला बळकटी देणारा, कृषी व पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या माध्यमातून रोजगार निर्मितीला चालना देऊन राज्याला पुन्हा एकदा विकासाच्या वाटेवर घेऊन जाणारा आजचा हा अर्थसंकल्प आहे अशी प्रतिक्रिया राज्याचे माजी अर्थ राज्यमंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांनी म्हटले आहे.

आज राज्यातील आघाडी सरकारचा दुसरा अर्थसंकल्प जाहिर झाला त्या अर्थसंकल्पाचे स्वागत करून कोरोनाच्या अभूतपूर्व संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या उत्पन्नात मोठी घट झालेली असतानाही महाराष्ट्र विकास आघाडी सरकारने आरोग्य, कृषी, शिक्षण, सिंचन, महिला, तरूण, विद्यार्थी, दलित, आदिवासी, अल्पसंख्यांक ग्रामीण व शहरी पायाभूत सुविधांसह विकास प्रकल्पासांठी भरघोस निधीची तरतूद या अर्थसंकल्पात केली असून राज्याला विकासाच्या वाटेवर घेवून जाणारा अर्थसंकल्प आहे अशी प्रतिक्रिया राज्याचे माजी अर्थ राज्यमंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांनी म्हटले आहे.

About The Author