स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठच्या सत्र निहाय परीक्षा प्रारंभ
लातूर (प्रतिनिधी) : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडच्या हिवाळी सत्र परीक्षा सोमवार दि.०८ मार्च २०२१ पासून दयानंद कला महाविद्यालयात प्रारंभ झाल्या असून covid-१९ च्या सर्व नियमांचे काटेकोर पालन करून परीक्षांचे कामकाज सुरू करण्यात आले आहे.
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडच्या वतीने कुलगुरु डॉ.उध्दवजी भोसले, प्र-कुलगुरु डॉ. जे.एम. बिसेन, व संचालक परीक्षा नियंत्रक व मूल्यमापन मंडळाचे डॉ. रवि सरोदे यांनी दयानंद कला महाविद्यालयाची क्लस्टर हेड म्हणून निवड केली आहे. क्लस्टर हेड विभागाच्या अंतर्गत लातूर जिल्ह्यातील ३१ महाविद्यालयाच्या परीक्षेचे कामकाज सुरू आहे. या विभागाचे प्रमुख म्हणून डॉ.बालाजी घुटे यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली आहे. क्लस्टर हेड सहसमन्वयक म्हणून डॉ.संतोष पाटील, डॉ.सुभाष कदम, प्रा.विवेक झंपले, प्रा.सचिन पतंगे कामकाज पाहत आहेत. तर परीक्षा विभाग प्रमुख म्हणून डॉ.अंजली जोशी, सहकेंद्र प्रमुख म्हणून डॉ.शिवकुमार राऊतराव, प्रा. राजकुमार मोरे हे कामकाज पाहत आहेत. विद्यापीठांतर्गत आय.टी. कॉर्डीनेटर पदी प्रा.महेश जंगापल्ले यांची निवड करण्यात आली आहे.
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या परीक्षेपासून कोणताही विद्यार्थी वंचित राहता कामा नये याची खबरदारी सर्व विभाग प्रमुखांनी घ्यावी असे प्रतिपादन याप्रसंगी प्राचार्य डॉ.शिवाजी गायकवाड यांनी केले.