जनतेच्या विश्वासाला पात्र राहून कव्हा गाव राज्यात प्रथम क्रमांकावर आणण्यासाठी प्रयत्नशील रहावे
माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर
लातूर (प्रतिनिधी) : स्मार्ट व्हिलेज कव्हा योजनेतून कव्हा गावचा चौफेर विकास करण्यात आलेला आहे. त्यामुळेच कव्हा गावातील जनतेने ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये ऐतिहासिक विजय दिला आहे. जनतेच्या अपेक्षापुर्ती करण्यासाठी विविध स्तरावर नुतन पदाधिकार्यांनी प्रयत्न करावा व कव्हा गाव राज्यात प्रथम आणण्यासाठी प्रयत्नशील रहावे, कव्हा या गावच्या विकासासाठी 12 समित्याची निर्मिती करण्यात आली असून यामुळे कव्हा गावच्या विकासाला चांगली गती मिळणार आहे. सर्वांणी एकदिलाने काम केल्यास कव्हा गावचे नाव आदर्श ग्रामविकासामध्ये अगे्रसर राहील. त्यासाठी जनतेच्या विश्वासास पात्र राहून कव्हा गाव राज्यात प्रथम आणण्यासाठी सर्वांनी प्रयत्नशील रहावे, असे प्रतिपादन माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी व्यक्त केला.
यावेळी ते कव्हा ग्रामस्थांच्या उपस्थितीत आयोजित पहिल्या आढावा बैठकीत बोलत होते. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी शिक्षणतज्ज्ञ प्रा.गोविंद घार हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष भागवतराव घार, उपसरपंच किशोर घार, ग्रामसेवक अनंत सुर्यवंशी, गोविंद सोदले, नेताजी मस्के,शिवशरण थंबा, दत्ता मामडगे, रसूल पठाण, मोहन घोडके, सदाशिव सारगे, नामदेव मोमले, कमलाकर होळकर, गोपाळ सारगे आदी मान्यवरांची उपस्थित होती.
यावेळी पुढे बोलताना माजी आ.कव्हेकर म्हणाले की, आपण 40 वर्षामध्ये केलेल्या कामाची पावती पाहून जनतेने आपणाला प्रचंड मताधिक्याने निवडून दिलेले आहे. यामध्ये काही अनुभवी पंचाचा समावेशही आहे. या टिमचा सद्उपयोग करून गावच्या उर्वरित विकासाचे स्वप्न साकार करावयाचे आहे. त्यामुळे आपण सर्वांनी एकत्र येवुन काम करण्याची गरज आहे.असही ते यावेळी बोलतांना शेवटी म्हणाले.प्रारंभी ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांच्या उपस्थितीत महिला दिनाचे औचित्य साधून सावित्रिबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले.यावेळी या बैठकीला कव्हा ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
कव्हा गावच्या विकासासाठी बारा समित्या…
लातूर तालुक्यातील स्मार्ट व्हिलेज कव्हा या गावचा चौफेर विकास केलेला आहे परंतू उर्वरीत विकास करण्यांसाठी नवीन पंचमंडळी निवडुन देण्यात आलेली आहे. या पंचमंडळीच्या माध्यमातून गावच्या विकासाला गती देण्यांसाठी बारा समित्या नियुक्त करण्यात आलेल्या आहेत. यामध्ये शिक्षण ,आरोग्य व स्वच्छता समितीच्या अध्यक्षपदी शिवशरण थंबा, पाणीवाटप समितीच्या अध्यक्षपदी सदाशिव सारगे, बांधकाम समितीच्या अध्यक्षपदी अनिता घोडके, ग्रामनिर्माण समितीच्या अध्यक्षपदी किशोर घार, ग्रामफेर आकारणी समितीच्या अध्यक्षपदी गोविंद सोदले, विद्युत समितीच्या अध्यक्षपदी रसुल पठाण, जैव विविधता समितीच्या अध्यक्षपदी किशोर घार, दक्षता समितीच्या अध्यक्षपदी नामेदव मोमल, सामाजिक मुल्यमापन समितीच्या अध्यक्षपदी किशोर घार, आपत्ती व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी दत्तात्रय मामडगे, वाहतूक समितीच्या अध्यक्षपदी काकासाहेब घोडके, अतिक्रमण मुक्त समितीच्या अध्यक्षपदी किशोर घार आदींच्या निवडी करण्यात आलेल्या आहेत. तर उर्वरित पदाधिकार्यांच्या निवडी लवकरच घोषीत करणार असल्याचे उपसरपंच किशोर घार व ग्रामसेवक अनंत सुर्यवंशी यांनी सांगितले.