शेतकरी संघटनेच्या युवा संपर्क अभियानाअंतर्गत बैठक संपन्न
लातूर (प्रतिनिधी) : औसा तालुक्यातील चलबुर्गा येथे दि. 8 आक्टोंबर रोजी शेतकरी संघटनेच्या युवा संपर्क अभियानाअंतर्गत बैठक घेण्यात आली. या बैठकीत शेतीमाल बाजार, आयात निर्यात धोरणामुळे होणारे नुकसान, अवेळी होणारा विज पुरवठा, बेरोजगारी, पिक विमा आदी विषयांवर चर्चा व मार्गदर्शन करण्यात आले. येणाऱ्या काळात शेतकऱ्यांच्या बाजार व तंत्रज्ञान स्वातंत्र्यासाठी होणाऱ्या लढ्यात सर्व शक्तीने सहभागी होणार असा निर्धार यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी केला. अनेक शेतकऱ्यांनी युवा जिल्हाध्यक्ष रुपेश शंके यांच्या हस्ते बिल्ला लावून संघटनेत प्रवेश केला. यावेळी शेतकरी संघटनेचे युवा जिल्हाध्यक्ष रुपेश शंके, कार्याध्यक्ष बालाजी जाधव, युवा तालुकाध्यक्ष विवेक पाटील, तालुका संपर्कप्रमुख कल्याणाप्पा हुरदळे, जेष्ठ कार्यकर्ते शिवाजी हजारे, शाखा प्रमुख दत्तु मुंगळे, उपाध्यक्ष अंकुश जाधव, लहु आळणे, विलास जाधव, संतोष मोरे आदिंसह शेतकरी उपस्थित होते.