महाराष्ट्रात गोसंवर्धन आयोगाची गरज – डॉ. लखोटिया

महाराष्ट्रात गोसंवर्धन आयोगाची गरज - डॉ. लखोटिया

उदगीर (एल.पी.उगीले) : महाराष्ट्र राज्यामध्ये गोसंवर्धन आयोग निर्माण केला जावा, आणि या आयोगामार्फत वृद्ध झालेल्या गाईंची सेवा तसेच केंद्र शासनाने पारित केलेल्या गोवंश हत्या बंदी कायदा प्रभावीपणाने राबवण्यासाठी कार्य केले जावे. देशी गाईंच्या दुधापासून, दह्यापासून, तुपापासून, सेना पासून मानवी आरोग्याच्या हिताचे अनेक पदार्थ बनवले जातात. या गोष्टीचे गांभीर्य विचारात घेऊन महाराष्ट्र शासनाने गोसंवर्धन आयोग स्थापन करावा. तसेच गोरक्षण करणाऱ्या संस्थांना अर्थसाह्य देऊन पाठबळ द्यावे. अशी आग्रही मागणी गोसंवर्धन प्रेमींच्या वतीने तहसीलदारांच्या मार्फत राज्य सरकारला करण्यात आली आहे. एका बाजूला आपण स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्सव साजरा करत असताना या देशाची संस्कृती जपणे देखील गरजेचे आहे. कृषीप्रधान देशात गोवंश अत्यंत महत्त्वाचा असून पशुधन हे शेतकऱ्यांचे खरे धन आहे. त्यामुळे त्याचे रक्षण होणे गरजेचे आहे. शेतीची यंत्रसामुग्रीच्या साह्याने मशागत करणे, सर्वसामान्य शेतकऱ्यांना परवडत नाही. तशा परिस्थितीत गोवंश टिकून राहिला तर शेतकऱ्यांना शेतीसोबत जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय देखील चांगल्या पद्धतीने करता येऊ शकेल. त्यासाठी शासनाने गोसंवर्धन आयोग निर्माण करावा. अशी आग्रही मागणी उदगीर गोरक्षण संस्थेचे अध्यक्ष तसेच उदयगिरी लायन्स धर्मादाय नेत्र रुग्णालयाचे अध्यक्ष डॉ. रामप्रसाद लखोटिया यांनी केले आहे.

या संदर्भात दिलेल्या निवेदनात गोसंवर्धन आयोग महाराष्ट्रात यासाठी आवश्यक आहे की, महाराष्ट्र हे कर्नाटक, आंध्रा आणि तेलंगणा या राज्यांच्या सीमेवर वसलेले राज्य असून गोहत्या बंदीचा कायदा असला तरीही चोरून लपून-छपून मोठ्या प्रमाणात हत्या केली जात आहे. हे सर्व थांबवण्यासाठी आयोग गरजेचा असल्याचे त्यांनी सांगितले.या विषयाचे स्वतंत्र निवेदन देण्यात आले, सदरील निवेदनावर डॉ.लखोटीया यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते प्रदीप बेंद्रे, महादेव नवबदे, सुबोध आंबेसंगे, रामदास जळकोटे, सतीश पाटील, अजय दंडवते, शांतिवीर मुळे, तानाजी हजारे, गणेश मुंडे, प्रशांत मांगुळकर, विश्वनाथ बिरादार, प्रा. रमाकांत महेश्वर, मोतीलाल डोईजोडे े रामभाऊ मोतीपले, प्रवीण जाहुरे, देविदास नादरगे, दीपक बलसुरकर इत्यादी मान्यवरांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

गायीचे दूध हे मानवी आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यासाठी गोरक्षणाची जबाबदारी सामाजिक संस्था जरी घेत असल्या तरी त्यांना शासनाचे पाठबळ मिळणे गरजेचे आहे. यासाठीच गोसंवर्धन आयोग स्थापन केला जावा. आणि या आयोगामार्फत संवर्धनाची कामे केली जावीत.

उदगीर शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये चर्च रोड भागातील एका अनोळखी व्यक्ती कडून मोटार सायकलवर पोत्यामध्ये घालून काहीतरी घेऊन जात असल्याचे पोलिसांना लक्षात आल्यानंतर संशय आल्यामुळे पोलिसांनी पाठलाग करून त्या व्यक्तीला पकडले असता, चर्च रोड जवळील एका घरामध्ये तो व्यक्ती गेला. त्या ठिकाणी पोत्यामध्ये गोवांशाची चमडी असल्याचे लक्षात आले. पोलीस प्रशासनाने या व्यक्तीच्या घरी धाड टाकून गोवंशाचे 110 कातडे आढळल्याने गुन्हा नोंद केला आहे.

उदगीर शहर पोलिसात आरोपी आतिख उस्मानांचा कुरेशी याच्याविरुद्ध महाराष्ट्र प्राणी (सुधारणा) अधिनियम 1995 -5 क, 9अ प्रमाणे गुन्हा नोंद केला आहे. पोलीस स्टेशन हद्दीतील अशा पद्धतीच्या गोवंश हत्तेच्या संदर्भात माहिती घेऊन नंबर नसलेल्या मोटरसायकल वरून एक व्यक्ती सीटवर काहीतरी पोत्यात बांधलेले घाटोढे घेऊन फिरताना आढळून आल्यामुळे त्याचा पाठलाग करून त्याच्या घरी जाऊन पाहणी केली असता त्याच्याजवळ एक लाख वीस हजाराचे चमडे पोलिसांनी जप्त केले आहे. चामडीचे सॅम्पल घेण्यासाठी पशुवैद्यकीय अधिकारी उदगीर यांना पत्रक देऊन बोलावून घेऊन, त्यांनी सॅम्पल घेतले व चामडीही नाशवंत असल्याने त्याची विल्हेवाट लावण्यासाठी नगरपरिषद मुख्याधिकारी यांना पत्र देऊन त्यांचे नगर परिषदेचे कर्मचारी यांना पाठवून सदरची चामडी ही टेम्पोमध्ये भरून पोलिसांनी सोमनाथपूर येथे जेसीबी मशीन ने मोठा खड्डा खोदून सदर खड्ड्यात टाकून कुजून विल्हेवाट लावली आहेत. असे असले तरीही या परिसरात हत्या केली जाते हे यावरून सिद्ध होते. या आणि अशा प्रकाराला थांबवण्यासाठी शासनाने सक्रिय राहून काम करण्यासाठी स्वतंत्र गोसंवर्धन आयोग स्थापन करावा. अशी आग्रही मागणी ही गोरक्षा समितीची आहे.

About The Author