शिवाजी महाविद्यालयाचा महिलांचा योगा संघ प्रथम तर पुरुषांचा संघ तृतीय
उदगीर (एल.पी.उगीले) : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या ब झोन योगा स्पर्धा उदगीर येथील कै. बापूसाहेब पाटील एकंबेकर महाविद्यालय येथे संपन्न झाल्या. या स्पर्धेत शिवाजी महाविद्यालयाच्या महिला संघाने प्रथम क्रमांक प्राप्त केला, तसेंच पुरुषांचा संघाने तृतीय क्रमांक पटकावला.
महिलांच्या संघामध्ये कु धनुरे नंदिनी, कु. शिकारे सोनाली, कु भोसले सेजल, कु. मेळकुंदे प्रतीक्षा,कु. सूर्यवंशी दिव्या या खेळाडूंनी खेळाचे चांगले प्रदर्शन केले.तसेच पुरुषांच्या संघात कोणाळे मारोती यांनी उत्कृष्ट प्रदर्शन केले .विजयी संघास किसान प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्रीरंगराव पाटील, सचिव ज्ञानदेव झोडगे, कौषाध्यक्ष चामले नामदेव,महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विनायक जाधव, उपप्राचार्य डॉ. एस व्ही. जगताप, उपप्राचार्य डॉ.आर. एम. मांजरे, कार्यालयीन कर्मचारी, विद्यार्थी, यांनी अभिनंदन केले. व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्या दिल्या .या खेळाडूंना मार्गदर्शन क्रीडा संचालक प्रा निहाल अहमद खान,प्रा. गजानन माने यांनी केले.