भाकसखेडा येथे मध्यान्ह भोजन योजना सुरुवात !

भाकसखेडा येथे मध्यान्ह भोजन योजना सुरुवात !

उदगीर (एल.पी.उगीले) : येथून जवळच असलेल्या भाकसखेडा गावांमध्ये महाराष्ट्र शासन कामगार विभाग यांच्यामार्फत चालविण्यात येणारी मध्यान्ह भोजन योजना सुरू करण्यात आली. सन्मान कष्टाचा आनंद उद्याचा यानुसार गावातील गोरगरीब मजुरांना एक वेळचं अन्न मिळावं या दृष्टिकोनातून महाराष्ट्र कामगार विभाग लातूर यांना ग्रामपंचायत भाकसखेडा यांनी विनंती केल्यानुसार ही योजना कार्यरत करण्यात आली. ही योजना गावात राबविली जावी, यासाठी सरपंच अर्चना लिंबाजी खेडकर, उपसरपंच अरविंद मोरे, चेअरमन विवेक जाधव व लिंबाजी खेडकर यांनी प्रयत्न केले.

यांच्या विनंतीला मान देऊन भाकसखेडा गावात कामगार विभाग यांचे उदगीर प्रतिनिधी विजय भालेराव, अक्षय सगट, ड्रायव्हर अमर बोंबलगे ,सोमनाथ वाघमारे हे आल्यानंतर गावात मध्यान्ह भोजन योजना राबविण्याचा शुभारंभ पंडित जाधव मंडळ अधिकारी यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी सरपंच सौ अर्चना खेडकर, लिंबाजी खेडकर, माजी सरपंच तुकाराम कांबळे, पुण्यवान कांबळे, कोंडीबा कांबळे, तुकाराम टेलर, रंजना कांबळे, देविदास कांबळे, बाबू कांबळे, राम कांबळे, रामभाऊ कांबळे, भीम कांबळे, ममताबाई कांबळे, शांताबाई कांबळे, चंपाबाई कांबळे यासह अनेक बांधकाम मजूर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ही योजना सातत्याने गावात राबण्यासाठी मजुराने वेळेवर आपला डब्बा दररोज घेऊन जावा. व त्यासाठी कामगार विभागाच्या येणाऱ्या प्रतिनिधीना सहकार्य करावे. असे मंडळाधिकारी पंडित जाधव यांनी सर्वांना सांगितले.

About The Author