राज्य उत्पादन शुल्क विभागाची निलंगा येथे धाड, अवैध मुद्देमाल जप्त

राज्य उत्पादन शुल्क विभागाची निलंगा येथे धाड, अवैध मुद्देमाल जप्त

निलंगा (प्रतिनिधी) : राज्य उत्पादन शुल्क विभागाचे लातूर जिल्ह्याचे अधीक्षक केशव राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली निलंगा येथील हॉटेल आराध्य येथे अवैध मद्य पुरवठा केला जातो, तसेच विक्री केली जाते. अशी माहिती प्राप्त झाल्यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने धाड टाकून दहा जणांना अटक करण्यात आली. याप्रकरणी 3995 रुपये किमतीचा अवैध मुद्देमाल जप्त करण्यात आला. या ठिकाणी मद्यपी आणि धाबा मालक यांच्यावर कारवाई करून ताब्यात घेतले होते. महाराष्ट्र दारूबंदी कायदा 1949 चे कलम 68 व 84 अन्वये हॉटेल चालक व मद्यपी वर कारवाई करण्यात आली. अटक करण्यात आल्यानंतर त्यांना न्यायालयात हजर केले असता, धाबा मालकाला 25000 तर इतर मद्यपिंना प्रत्येकी एक हजार रुपये प्रमाणे दंड करण्यात आला. सदरील कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक उदगीर विभाग आर एम चाटे, दुय्यम निरीक्षक स्वप्निल काळे, अ.ब. जाधव, एल. बी. माटेकर, ए.के. शिंदे, सहाय्यक दुय्यम निरीक्षक गणेश गोले यांनी सहभाग घेतला होता.

About The Author