जिल्हा विधी सेवा प्राधिकरणमार्फत आर्वी येथे कायदेविषयक जनजागृती

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणमार्फत आर्वी येथे कायदेविषयक जनजागृती

लातूर (एल.पी.उगीले) : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणमार्फत कायदेविषयक जनजागृती कार्यक्रमाद्वारे नागरीकांचे सशक्तीकरण अभियानांतर्गत आर्वी येथे कायदेविषयक जनजागृती शिबीर पार पडले. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्ष सुरेखा कोसमकर यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामसेवक एस. आर. शेख होते.

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणने या शिबिराचे आयोजन केले होते. अ‍ॅड. रमेश कुचमे, अ‍ॅड. बीना कांबळे, अ‍ॅड. गायत्री नल्ले व विधी स्वयंसेवक पार्वती सोमवंशी आदी यावेळी उपस्थित होते.

अ‍ॅड. कुचमे यांनी महिलांचे अधिकार तसेच ४९८ सीआरपीसी या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. अ‍ॅड. कांबळे यांनी कौटुंबिक हिंसाचारबाबत कायद्याविषयी मार्गदर्शन केले, तर अ‍ॅड. नल्ले यांनी विधी सेवा प्राधिकरणविषयी माहिती दिली. विधी स्वंयसेवक सोमवंशी यांनी ज्येष्ठ नागरिकांचे अधिकार तसेच विधी सेवा प्राधिकरणच्या योजनांची माहिती दिली.

यावेळी विविध कायदेविषयक पत्रकांचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमास आशा कार्यकर्त्या, अंगणवाडी कार्यकर्त्या, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ उपस्थित होते.

About The Author