२८ लाखाचा गुटखा जप्त;
उमरगा पोलिसाची कारवाई
उमरगा (मंमाळे नितीन) : शहरातील हॉटेल गंधर्व जवळील एच पी पेट्रोल पंपाच्या आवारात आयशर टेम्पो संशयितरित्या बराच वेळ उभा असल्याची माहीती सहाय्यक पोलीस निरीक्षक कवडे यांना मिळाली.
सदरील ठिकाणी पोलीस पथक रवाना होऊन तपासणी केली असता गुटखा सदृश अन्नपदार्थ दिसून आले. पेट्रोल पंपावर या गाडीबाबत सखोल चौकशी केली असता कोणीही गाडीचा चालक उपस्थित नसल्याने आयशर टेम्पो पोलीसांनी ताब्यात घेतला. सखोल माहीती मिळवण्यासाठी अन्नसुरक्षा अधिकारी पथक यांना मालाची पाहणी करण्यासाठी पाचारण करण्यात आले . एकूण ३५ पोते आढळून आले. प्रत्येक पोत्यात गोवा १००० कंपनीचे ५५ पॅकेटसह एकूण २८ लाखाचा माल असल्याचे निष्पन्न झाले.पोलीस तपास यंत्रणेतून आरोपी आजन्म करीमसाबा शेख वय ३८ राहणार हमीद नगर यांच्याविरुद्ध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.