अनुप अभ्यासिका व स्पर्धा परीक्षा केंद्र येथे मोफत मार्गदर्शन
उदगीर (एल.पी.उगीले) : येथील नगरपरिषद कॉम्प्लेक्स येथे आगामी स्पर्धा परीक्षा व पोलीस भरती अनुषंगाने अनुप अभ्यासिका केंद्राचे संचालक अंतेश्वर मोरखंडे व दीपक पांडे यांच्या संकल्पनेतून सुरू असलेल्या सर्वांसाठी मोफत मासिक स्पर्धा परीक्षा सराव परीक्षेतील प्रथम, द्वितीय व तृतीय आलेले विद्यार्थी यांचा प्रमुख पाहुणे चंद्रशेखर मोरखंडे – पोलीस उप निरीक्षक गोंदिया व शेटकर क्लासेसचे संचालक प्राध्यापक शेटकर यांच्या हस्ते योग्य बक्षीस व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
अनुप अभ्यासिका येथील कार्यक्रमात आगामी स्पर्धा परीक्षा व पोलीस भरती अनुषंगाने पोलीस उपनिरीक्षक मोरखंडे यांनी विद्यार्थ्यांना आगामी पोलीस भरती लेखी परीक्षा, मैदानी परीक्षा तसेच परीक्षेपूर्वी व परीक्षा देते वेळी काय काळजी घ्यावी या बाबत मार्गदर्शन केले, विद्यार्थ्यांनी आगामी स्पर्धा परीक्षा व पोलीस भरतीत अनुप अभ्यासिका केंद्राचा उपयोग करून जास्तीत जास्त विद्यार्थी यांना यश संपादन करावे म्हणून अनुप अभ्यासिका केंद्रात प्रा. मोरखंडे व प्रा.पांडे यांनी विविध सोयी सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत. त्यात सुसज्ज हवेशीर अशी अभ्यासिका, मोफत वायफाय, दररोज मैदानी चाचणी बाबत प्रशिक्षण, RO चे पाणी, स्पर्धा परीक्षा उपयोगी संदर्भ ग्रंथ, मासिक लेखी व मैदानी चाचणी इत्यादी सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार आणखीनही सुविधा देण्याची हमी दिलेली आहे.
सदर कार्यक्रमात अनुप अभ्यासिका केंद्राचे संचालक अंतेश्वर मोरखंडे व दीपक पांडे व बिरादार यांनीही विद्यार्थ्यांना योग्य असे मार्गदर्शन केले. तसेच सर्वांनी अभ्यासिकेतील विद्यार्थ्यांना अनुप अभ्यासिका केंद्राचा उपयोग करून जास्तीत जास्त यश संपादन करावे या बाबत शुभेच्छा दिल्या.