महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात राष्ट्रीय एकता दिवस साजरा

महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात राष्ट्रीय एकता दिवस साजरा

उदगीर (एल.पी.उगीले) : येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात राष्ट्रीय एकता दिनानिमित्त राष्ट्रीय छात्र सेना,राष्ट्रीय सेवा योजना आणि क्रीडा विभाग यांच्यावतीने राष्ट्रीय एकात्मता दिवस साजरा करण्यात आला. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.एम.संदीकर व एन.सी.सी.चे कंपनी कमांडर डॉ.आर.पी.साबदे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले, याप्रसंगी राष्ट्रीय एकात्मता दौड चे आयोजन करण्यात आले. या दौड चे उद्घाटन प्राचार्य डॉ.बी.एम.संदीकर यांनी हिरवा ध्वज दाखवून केले. यावेळी झालेल्या कार्यक्रमात प्राचार्य यांनी उपस्थित सर्व छात्र सैनिक व विद्यार्थ्यांना राष्ट्रीय एकात्मतेची शपथ दिली. या कार्यक्रमांमध्ये राष्ट्रीय छात्र सेनेचे सर्व छात्रसैनिक तसेच राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी यांनी सहभाग घेतला. याबरोबरच आज सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती आणि श्रीमती इंदिरा गांधी यांची पुण्यतिथि असल्याने प्राचार्य डॉ.बी.एम.संदीकर यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी उपप्राचार्य डॉ.आर.के.मस्के(व.म.), उपप्राचार्य सी.एम.भद्रे, एन.एस.एस. विभागाचे कार्यक्रमाधिकारी डॉ.बी.एस.होकरणे, क्रीडासंचालक प्रा.एस.बी.मुंडे, देवणी येथील प्रा.डॉ.चामले, प्रा.रोहन एनाडले तसेच शिक्षक आणि कार्यालयीन कर्मचार्‍यांची उपस्थिती होती.

About The Author