अवैध धंद्यावर कारवाई वाढवणा पोलीस स्टेशन मध्ये 20 इसमाविरुद्ध कारवाई
लातूर (एल.पी.उगीले) : लातूर जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे आणि त्यांच्या साथीदारांनी अवैध्य धंद्याच्या विरोधात मोहीम काढली असून त्या संदर्भात कारवाई करण्यासाठी वेगवेगळ्या पोलीस स्टेशन अंतर्गत वेगवेगळी पथके निर्माण केले आहेत वाढवणा पोलीस स्टेशन हद्दीतील जुगाराच्या अड्ड्यावर दहा टाकून वीस व्यक्तींच्या विरोधात कारवाई करण्यात आली आहे.
या बाबत थोडक्यात हकीकत अशी की, पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी लातूर जिल्ह्यात अवैध धंद्याविरुद्ध कारवाई करण्याकरिता निर्देशित केले होते.त्या अनुषंगाने अप्पर पोलीस अधीक्षक डॉ.अजय देवरे यांचे मार्गदर्शनात सर्वच पोलीस ठाणे व उपविभाग स्तरावर अवैध धंद्याविरुद्ध मोहीम राबविण्यात येत आहे.
उपविभागीय पोलिस अधिकारी तथा सहाय्यक पोलीस अधीक्षक (अहमदपूर) निकेतन कदम यांचे मार्गदर्शनात व वाढवणा तालुक्यातील अवैध धंद्याविरूद्ध कारवाई करण्याचे अनुषंगाने अधिकारी व अंमलदार यांचे स्वतंत्र पथक तयार करून विशेष मोहीम राबविली.
तालुक्यातील अवैध धंद्यावर कारवाई करीत असताना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून वाढवणा पोलीस स्टेशन हद्दीतील हाळी शिवारातील विविध ठिकाणी छापा मारले असता तेथे इसम नामे जलील मीरासाब शेख,( वय35 वर्ष,राहणार हाळी तालुका उदगीर) ,धनराज विठ्ठल मसुरे, (वय 40 वर्ष,राहणार हाळी तालुका उदगीर) करण यादव कोल्हेवाड, (24 वर्ष राहणार डोंग्रज तालुका चाकूर) , जावेद खाजा पाशा पठाण, (राहणार, हाळी तालुका उदगीर) आमिरखा इस्माईलखा पठाण, (वय 45 वर्ष,राहणार,हाळी तालुका उदगीर) अजीज लतीफ पठाण,( वय 35 वर्ष,राहणार,हाळी तालुका उदगीर), हमजा रसूलसाब शेख, (सर्व राहणार,हाळी तालुका उदगीर),नारायण भिऊदास भिसे, वय 29 वर्ष,(राहणार चापोली तालुका चाकुर), तमजिद जब्बार देशमुख (वय 41 वर्ष, राहणार चापोली तालुका चाकुर), विश्वनाथ शिवराज स्वामी,( वय 45 वर्षे, राहणार चापोली तालुका चाकुर), बालाजी लिंबाजी पवार, (वय 45 वर्षे सर्व राहणार चापोली तालुका चाकुर), गोविंद गणपती साळी,( वय 50 वर्षे, रा. दादरा ता. धरणी, जि. अमरावती), नारायण नामदेव भवाळ, (वय 52 वर्षे, रा.कुमठा ता. अहमदपूर), खादरसाब गफुरसाब शेख, (वय 74 वर्षे,राहणार हाळी तालुका उदगीर), अनिल कमलबाई कांबळे, (वय 46 वर्षे, राहणार. हाळी ता. उदगीर) , वामन अर्जुन समुखराव,( वय 35 वर्षे,राहणार हाळी तालुका उदगीर) , रत्नदीप हरिभाऊ तलवारे, (वय 38 वर्षे, राहणार हवगीस्वामी गल्ली, उदगीर ),समशोद्दिन सय्यद, (वय 48 वर्षे रा.राहणार हवगीस्वामी गल्ली, उदगीर), जावेद खाज्यापाशा पठाण, (राहणार. हाळी ता. उदगीर),खाज्या हमीद शेख,(राहणार. हाळी ता. उदगीर)असे इसम वेगवेगळ्या ठिकाणी ग्रुप करून स्वतःच्या फायद्यासाठी लोकांकडून पैसे घेऊन मटका जुगार खेळत व खेळवीत असताना आढळून आले.त्यांच्याकडून जुगाराचे साहित्य,रोख रक्कम व मोटारसायकल असा एकूण 61 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. नमूद आरोपी विरोधात पोलीस ठाणे वाढवणा येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक 179/2022, कलम 12(अ) मुंबई जुगार कायदा , गुन्हा रजिस्टर क्रमांक 180/2022, कलम 12 मुंबई जुगार कायदा,गुन्हा रजिस्टर क्रमांक 181/2022, कलम 12 मुंबई जुगार कायदा अन्वये 03 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सदर गुन्ह्याचा तपास वाढवणा पोलीस करीत आहेत.
सदरची कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनात व उपविभागीय पोलीस अधिकारी अहमदपूर निकेतन कदम यांचे नेतृत्वात उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, चाकूर व अहमदपूर येथील पोलीस अधिकारी,अंमलदारांनी केली आहे.