पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांच्या पुढाकारातून पोलिसांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन

पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांच्या पुढाकारातून पोलिसांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन

लातूर (एल.पी.उगीले) : सामाजिक जाणीव जपण्यासाठी आपल्या विभागातील कर्मचारी सुदृढ असले पाहिजे. “आरोग्यम् धनसंपदा” म्हणतात, त्याप्रमाणे पोलीस प्रशासनाचे आरोग्य चांगले असेल तर त्यांचे कार्य तत्परता वाढते. या गोष्टीची जाणीव ठेवून नूतन जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी आपल्या कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेत आरोग्य शिबिराचे आयोजन केले होते. हे शिबिर चांगल्या पद्धतीने यशस्वी झाले.

याबाबत थोडक्यात माहिती अशी की, कायदा सुव्यवस्थेचे रक्षण करताना,गुन्ह्यांचा तपास, आंदोलने,मोर्चे,व्हीआयपींचे दौरे,गस्त यामुळे पोलिसांना जास्त वेळ कर्तव्य बजवावे लागते. या कारणाने त्यांना स्वत:च्या आरोग्याची काळजी घेता येत नाही. या सर्व गोष्टींचा विचार करून पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी जिल्हा शल्य चिकित्सक लक्ष्मणराव देशमुख यांच्याशी चर्चा व पत्रव्यवहार करून लातूर जिल्हा पोलीस दलाच्या आस्थापनेवर असलेले 123 पोलीस उपनिरीक्षक ते पोलीस अधीक्षक दर्जाचे पोलीस अधिकारी व 1934 पोलीस अमलदारांची आरोग्य तपासणी 15 नोव्हेंबर ते 19 नोव्हेंबर दरम्यान होणार असून यामध्ये पोलिसांचे रक्तदाब, मधुमेह, बीएमआय, ई.सी.जी, लिपिड प्रोफाईल यासारख्या विविध चाचण्या करण्यात करण्यात येणार आहेत. पोलिसांच्या आरोग्य विषयक गंभीर समस्याचा वेळीच निराकरण व औषधोपचार होणार असून आरोग्यविषयक मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

लोकसंख्येच्या तुलनेत पोलिसांकडे मनुष्यबळ कमी असल्याने उपलब्ध कर्मचाऱ्यांवर ताण येतो. अनेकदा पंधरा ते सोळा तास काम करावे लागते. जागरण, अवेळी जेवण, यामुळे व्याधी जडतात. पोलिसांनी निरोगी राहावे या उद्देशाने पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांचे संकल्पनेतून आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात येत असून सदरचे शिबिर पाच दिवस चालणार असून पोलीस स्टेशन स्तरावर तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयात तसेच पोलीस अधीक्षक कार्यालयात वैद्यकीय सेवा देणारे अधिकारी व कर्मचारी मार्फत पोलिसांची आरोग्य तपासणी होणार आहे.

सदरचे आरोग्य शिबिर यशश्वी करण्याकरीता अपर पोलीस अधीक्षक डॉ.अजय देवरे, पोलीस उपाधीक्षक (गृह )अंगद सुडके यांचे मार्गदर्शनात पोलीस कल्याण विभागाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बाळासाहेब नरवटे हे परिश्रम घेत असून सदरच्या आरोग्य शिबिरामध्ये तपासणी करून घेणारे पोलीस अधिकारी व अमलदारांची संख्यात्मक माहिती तसेच त्यांची तपासणी अहवालाची माहिती संकलित केली जात असून त्या माहितीवरून पुढील उपाययोजना करण्यात येणार आहे

About The Author

error: Content is protected !!