प्राचार्य डॉ. वसंत बिरादार यांना अमेरिकेन विद्यापीठाची डी.लिट्.

प्राचार्य डॉ. वसंत बिरादार यांना अमेरिकेन विद्यापीठाची डी.लिट्.

अहमदपूर ( प्रतिनिधी) : महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध पत्रकार, लेखक, समीक्षक तथा महात्मा फुले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांना अमेरिकेतील नामांकित ‘ द युनिव्हर्सिटी ऑफ सेंट्रल अमेरिका ‘ या विद्यापीठाच्या वतीने डॉक्टर ऑफ लेटर्स ‘ अर्थात डी. लिट्. ही मानाची पदवी देऊन गौरविण्यात आले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांनी महाराष्ट्रातील ‘दै. लोकमत’ नामांकित वृत्तपत्रातून सातत्याने पंचवीस वर्षे सामान्यांना न्याय मिळवून देणारी समाजोपयोगी व शोधपत्रकारिता केली. तसेच ‘ हिरवे झंकार ‘ , ‘ सावली सावली ऊन दे’ , ‘ भावानुबंध ‘ हे ललित लेख संग्रह,’ राजकीय तिरंदाजी ‘ हे राजकीय लेखांचे पुस्तक, ‘ कवितेच्या गाभाऱ्यात ‘ , ‘ कविता: समीक्षा आणि सौंदर्य’ हे काव्य समीक्षा ग्रंथ, ‘ प्राचीन मराठी वाङ्मयाचा इतिहास ‘ , ‘ अर्वाचीन मराठी वाङ्मयाचा इतिहास ‘ , ‘ व्यावहारिक मराठी ‘ यासह पंधरा ग्रंथसंपदा प्रसिद्ध आहेत. याबरोबरच विद्यापीठीय अभ्यासक्रमाचे संपादन ग्रंथ, विविध ग्रंथाचे संपादक म्हणून कार्य केले प्रकाशित आहे.

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या मराठी अभ्यास मंडळाचे सदस्य म्हणून त्यांनी सातत्याने पंधरा वर्षे काम, डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद च्या मराठी अभ्यास मंडळावर मराठी विषयतज्ज्ञ पाच वर्ष काम केले आहे. तसेच विविध सामाजिक, शैक्षणिक संस्थेवर ते नियुक्त असून, साहित्य संस्थेवरही कार्य केले आहे. संशोधन मार्गदर्शक म्हणून त्यांनी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिकसह विविध विद्यापीठांमध्ये एम. फिल., पीएच. डी. चे संशोधन मार्गदर्शक, म्हणून काम केले आहे.

त्यांच्या शैक्षणिक व सांस्कृतिक कार्याची दखल घेऊन अमेरिकेतील नामांकित विद्यापीठाने त्यांना डी.लिट्. पदवी बहाल केली आहे. त्याबद्दल प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांचे किसान शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव , सहसचिव तसेच सर्व पदाधिकारी यांनी अभिनंदन केले आहे.

About The Author