इनरव्हील क्लब उदगीर तर्फे स्वेटर चे वाटप

इनरव्हील क्लब उदगीर तर्फे स्वेटर चे वाटप

उदगीर (एल.पी.उगीले) : बाल दिनाचे औचित्य साधून इनरव्हील क्लब उदगीर तर्फे लक्ष्मीबाई प्राथमिक विद्यालय येथील विद्यार्थ्यांना थंडीपासून बचाव व्हावा. यासाठी स्वेटर वाटप करण्यात आले . लक्ष्मीबाई प्राथमिक विद्यालयात बहुतांश मुले मोलमजुरी व ऊसतोड कामगारांचे आहेत, या स्वेटर वाटपाच्या प्रोजेक्ट प्रमुख म्हणून डॉ. तृप्ती दाचावार व दीपा कुलकर्णी या होत्या. तसेच या प्रोजेक्ट साठी लक्ष्मीबाई प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक एम. के. तोडकर, एस. एम. पाटील , सौ व्ही.व्ही. करेप्पा, एस. बी. शिवशेट्टी, टी. आर. मुसने ,जे. एच. बंडेवार, पी. के. शिंदे, संगीता सूर्यवंशी यांचे सहकार्य लाभले.

याचबरोबर इनरव्हील क्लब उदगीरच्याअध्यक्षा सौ. मीरा चेंबुले ,उपाध्यक्ष सौ. स्वाती गुरुडे, कोषाध्यक्ष मानसी चन्नावार, आय एस ओ स्नेहलता चणगे, संपादक सौ. पल्लवी मुक्कावार, सदस्य पल्लवी कुलकर्णी ,नेहा जैन, प्रिया नारखेडे ,तुलसी देशमुख, योजना चौधरी यांची उपस्थिती होती.

About The Author

error: Content is protected !!