बर्दापूर येथे मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

बर्दापूर येथे मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

उदगीर (एल.पी.उगीले) : उदगीर येथील उदयगिरी लायन्स नेत्र रुग्णालय आणि अंबाजोगाई तालुक्यात बर्दापूर येथिल आदर्श मैत्री फाउंडेशन यांच्या संयुक्त उपक्रमातून येत्या सोमवारी 21/ 11/ 2022 रोजी महादेव मंदिर बर्दापूर येथे सकाळी दहा ते चार या वेळेत मोफत नेत्र तपासणी व अल्प दरात मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर घेण्यात येणार आहे. रुग्णांनी तपासणी करण्यासाठी तसेच या शिबिराचा लाभ घेण्यासाठी आपले ओळखपत्र व आधार कार्ड सोबत घेऊन उपस्थित रहावे. जास्तीत जास्त रुग्णांनी तपासणी करून घ्यावे असे आवाहन आदर्श मैत्री फाऊंडेशनचे अध्यक्ष संतोष बिराजदार यांच्या मार्गदर्शनाखाली आदर्श मैत्री फाउंडेशन बर्दापूर शाखेचे अध्यक्ष पप्पू बाहेती ,घाटनांदुर शाखेचे अध्यक्ष लक्ष्मण चव्हाण, परळी शाखेच्या अध्यक्षा सौ. शुभांगी ताई पतंगे यांच्यासह आदर्श मैत्री फाऊंडेशनचे सर्व सदस्य यांच्यासहअनेकांनी केले आहे. तर मोफत नेत्र तपासणी शिबिराचे नियोजन बर्दापूर स्वच्छता कमिटीने या शिबिराचे नियोजन केले आहे.

उदगीर येथील उदयगिरी लायन्स नेत्र रुग्णालय यांच्या वतीने मोफत नेत्र तपासणी शिबिरांच्या आयोजन संपूर्ण मराठवाड्यासह सीमावर्ती भागात देखील मोठ्या प्रमाणात केले जात असून, प्रत्येक गाव अंधत्व मुक्त करण्यासाठी उदयगिरी लायन्स नेत्र रुग्णालयाचे अध्यक्ष डॉ. रामप्रसाद लखोटिया यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण टीम सक्रियपणे कार्यरत आहे. त्याचा फायदा मराठवाड्यासह परिसरातील अनेक गावांना होत आहे. त्याबद्दल नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे.

About The Author

error: Content is protected !!