शिवाजी महाविद्यालयाला पॉवर लिफ्टिंग व बेस्ट फिसिक मध्ये जनरल चॅम्पियनशिप

शिवाजी महाविद्यालयाला पॉवर लिफ्टिंग व बेस्ट फिसिक मध्ये जनरल चॅम्पियनशिप

उदगीर (एल.पी.उगीले) : उदगीर येथे संपन्न झालेल्या अंतर महाविद्यालयीन ”ब ”विभागीय पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत येथील शिवाजी महाविद्यालयाच्या खेळाडू विद्यार्थ्यांनी उज्वल यश संपादन केले आहे. ज्यामध्ये प्राधान्याने, केंद्रे विष्णू 83 किलो वजन गटात प्रथम क्रमांक,राठोड सचिन 105 किलो ग्राम वजन गटात द्वितीय क्रमांक,शेख फर्दीन 66 किलो ग्राम वजन गटात प्रथम क्रमांक ,पिंजारी असद 74 किलो ग्राम वजन गटात तृतीय क्रमांक , जामदाळे अशोक 59 किलो ग्राम वजन गटात तृतीय क्रमांक मिळवून यांनी जनरल चॅम्पियनशिप मिळवली. तसेच बेस्ट फिसिक या प्रकारात शेख फर्दीन 65 किलो वजन गटात प्रथम क्रमांक,जामदाळे अशोक 59 किलो ग्राम वजन गटात द्वितीय क्रमांक,बागवान तृतीय क्रमांक तर वेट लिफ्टिंग या क्रीडा प्रकारात केंद्रे विष्णू 81 किलो ग्राम वजन गटात प्रथम क्रमांक ,राठोड सचिन 95 किलो ग्राम वजन गटात द्वितीय क्रमांक,पिंजारी असद 73 किलो ग्राम वजन गटात तृतीय क्रमांक मिळवले आहेत.

खेळाडूंना नेहमी प्रोत्साहित करणारे किसान शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्रीरंगराव पाटील, सचिव ज्ञानदेव झोडगे, कोषाध्यक्ष चामले नामदेव, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विनायक जाधव, उपप्राचार्य डॉ. एस. व्ही जगताप, उपप्राचार्य डॉ. आर. एम. मांजरे,कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. विलास भोसले, पर्यवेक्षक प्रा. जी. जी. सूर्यवंशी,शिक्षक वृंद, खेळाडू व कर्मचारी यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. क्रीडा विभागाचे संचालक प्रा. नेहाल अहेमद , प्रा. गजानन माने यांनी खेळाडूंना मार्गदर्शन केले

About The Author