मतदारसंघात धवल क्रांती घडवणार – आ. बाबासाहेब पाटील
अहमदपूर (गोविंद काळे) : उजना मिल्क प्रॉडक्ट प्रायव्हेट लिमिटेड यांच्यावतीने अहमदपुर, चाकूर, गंगाखेड, लोहा, पालम, पुर्णा, कंधार, उदगीर व जळकोट भागातील सर्व दुध पुरवठादार शेतकरी बांधवांसाठी सुप्रसिद्ध डॉ. अनिल भिकाने साहेब यांचे निशुल्क मार्गदर्शन आयोजित करण्यात आले होते. यावेळी उपस्थित राहून दूध उत्पादक शेतकरी बांधवांशी आमदार बाबासाहेब पाटील साहेब यांनी संवाद साधत यशस्वी वाटचालीबद्दल शेतकरी बांधवांबरोबरच संचालक मंडळाचे अभिनंदन केले.
कोणताही व्यवसाय करताना त्यांना मार्गदर्शन लाभणे ही अंत्यत महत्वाची बाब आहे. बागायती आणि कोरडवाहु शेतकऱ्यांना जोडधंदा म्हणून पशुपालन व दुधव्यवसाय करणे तसेच देशातील दुधाची मागणी लक्षात घेता शास्त्रशुध्द पध्दतीने दुध उत्पादनात वाढ करून जास्तीत जास्त नफा मिळवण्याची संधी शेतकरी बांधवांना आहे. दुग्ध व्यवसायात महिला भगिनींना सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, असे आश्वासन यावेळी दिले.
प्रसंगी माजी मंत्री बाळासाहेबजी जाधव साहेब, चेअरमन अविनाशभैय्या जाधव, सौ.चंदा पाटील, संचालिका सौ. दिपाली जाधव, संचालक सुरजभैय्या पाटील, डेअरी जनरल मॅनेजर पंजाबराव कदम, महेश अर्बन बँक उपाध्यक्ष निवृत्तीराव कांबळे, माजी जिल्हा परिषद सदस्य माधवराव जाधव, बाबूलाल येरमे, व्हाईस प्रेसिडेंट पी.जी. व्होनराव, सचिन भिकाने, उत्तमराव देशमुख, तुकाराम पाटील, प्रशांत पाटील सर, हेमंतराव जाधव, जनरल मॅनेजर पिसाळ, दीपकराव भराटे, ज्ञानेश्वर शेळके, केन ऑफिसर मिटकर, सतीश क्षिरसागर, दयानंद पाटील, अँड. सादिक शेख, श्याम देवकते, सचिन पडीले, शेखर चौधरी, गजानन परांडे, बालाजी रोकडे, बळीराम माकने, अनिल बेंबडे, अमित गुंडरे, किशन कापसे, गंगाधर गुरमे, उद्धवराव इप्पर, तसेच सर्व पत्रकार बंधू, शेतकरी बांधव, दूध डेरी चेअरमन, दूध उत्पादक शेतकरी आदी मान्यवर उपस्थित होते.
