विभागीय स्पर्धेत बालाघाट तंत्रनिकेतन चे नेत्रदीपक यश

विभागीय स्पर्धेत बालाघाट तंत्रनिकेतन चे नेत्रदीपक यश

अहमदपूर (गोविंद काळे) : IEDSSA झोन 2 शासकीय तंत्रनिकेतन नांदेड अंतर्गत विभागीय क्रीडास्पर्धा मानवत,परभणी येथे आयोजित करण्यात आली होती, त्यात 1500 मी धावणे मध्ये आपल्या बालाघाट तंत्रनिकेतन महाविद्यालयातील कैलास पपलवाड या विद्यार्थ्याने प्रथम क्रमांक पटकविला आहे व याच स्पर्धेत निलेश नरवटे या विद्यार्थ्याने द्वितीय क्रमांक पटकावला आहे. थाळीफेक या क्रीडा प्रकारा मध्ये राठोड आकाश याने प्रथम क्रमांक पटकविला आहे. या घवघवीत यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष तथा भाजपाचे प्रदेश प्रवक्ते गणेश दादा हाके पाटील संस्था सचिव रेखाताई तरडे संचालक अमरदीप हाके प्राचार्य स्वप्निल नागरगोजे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य मदन आरदवाड ,प्राध्यापक तसेच प्राध्यापकेत्त्तर कर्मचारी यांच्याकडून अभिनंदन करण्यात आले.

About The Author

error: Content is protected !!