वस्तुनिष्ठ व प्रामाणिक अर्थसंकल्प – आमदार बाबासाहेब पाटील
अहमदपूर (गोविंद काळे) : कोरोनामुळे राज्याची आर्थिक परिस्थिती विपरित आहे. उत्पन्नाचे स्त्रोत कमी झालेले आहेत. केंद्र सरकारचे भरीव सहकार्य तर सोडाच पण राज्याच्या हिस्स्याचे पैसेही वेळेवर मिळत नाही. अशा परिस्थितीतही एक चांगला, वस्तुनिष्ठ असा अर्थसंकल्प मांडल्याबद्दल राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार हे अभिनंदनास पात्र आहेत. अशी प्रतिक्रिया आजच्या अर्थसंकल्पावर चाकुर अहमदपुर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार बाबासाहेब पाटील यांनी दिली आहे.
कुठेही बडेजाव नाही, पोकळ घोषणा नाहीत आणि सध्याची परिस्थिती लक्षात घेता सार्वजनिक आरोग्य सेवा, पायाभूत सुविधा, शेतकरी, महिला तसेच इतर गरजू घटक व क्षेत्रांसाठी आवश्यक त्या तरतुदी करण्याचे काम या अर्थसंकल्पात झाले आहे. महाराष्ट्राच्या सर्व विभागांना व घटकांना न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न त्यांनी केला आहे असेही मत आमदार बाबासाहेब पाटील यांनी व्यक्त केले आहे.