तपसे चिंचोली, गाडवेवाडी येथे महिला दिन साजरा
लामजना (प्रशांत नेटके) : एस बी आय फाऊंडेशन मुंबई व जनविकास प्रतिष्ठान औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ग्रामसेवा कार्यक्रम अंतर्गत ग्रामपंचायत तपसे चिंचोली येथे जागतिक महिला दिन ८ मार्च २०२१ रोजी साजरा करण्यात आला.
गाडवेवाडी येथे महिला दिन साजरा करण्यात आला. महिलांना असलेले हक्क व अधिकार तसेच महिलांनी स्वतः स्वयंपूर्ण होण्यासाठी बचत गट स्थापन करून त्या माध्यमातून लघुउद्योग केले पाहिजे. तसेच सर्वांनी बँकिंग व्यवहार केले पाहिजे, आर्थिक विकास करण्यासाठी आपण स्वतः प्रयत्न केले पाहिजे असे मत मान्यवरांनी या वेळी मांडले. या कार्यक्रमासाठी ग्रामविकास अधिकारी श्री जोशी साहेब, महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) सह्योगिनी सरोजा बनसोडे, ग्रामपंचायत सदस्य अल्का नागनाथ गाढवे व राजश्री हिराजी राठोड, आशा कार्यकर्ता नंदिनी माधव गाढवे, अंगणवाडी सेविका लताबाई तुकाराम कांबळे, छबिता सिधेश्वर खरोसे,रेखा दत्तात्रय भारती,मुक्ताबाई भाऊराव राठोड , ग्रामपंचायत सदस्य शिवशंकर गाढवे, एस बी आय .चे ग्रामसेवक विकास भारती, बापू कदम ,राहुल घुळे, पद्माकर तौर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राहुल घुळे यांनी केले व आभार अल्का गाढवे यांनी मांडले.