रोटरी क्लब अहमदपूर तर्फे वाश इन स्कुल उपक्रम
अहमदपूर (गोविंद काळे) : रोटरी क्लब अहमदपूर यांच्या वतीने वाश इन स्कुल (WINS PROJECT) या उपक्रमांतर्गत शहरातील विविध शाळेत हँन्ड वाशचे वाटप करुन विद्यार्थ्यांना स्वच्छतेबद्दल मार्गदर्शन करण्यात आले.
शहरातील विविध शाळेतील जवळपास चार हजार विद्यार्थ्यांना रो.कपील बिरादार यांनी हात कसे धुवावेत व कोवीड 19च्या काळात स्वच्छतेबद्दल कशी काळजी घ्यावी याबद्दल मार्गदर्शन केले.यावेळी शहरातील विविध शाळेत रोटरी क्लब च्या वतीने हँन्ड वाशचे वाटप करण्यात आले.
यावेळी यशवंत विद्यालयाचे मुख्याध्यापक बालाजी बिरादार पर्यवेक्षक उमाकांत नरडेले,हाणमंत आचेगावे कलाशिक्षक महादेव खळुरे अब्दुल हमीद उर्दु प्राथमिक स्कूलचे मुख्याध्यापक एजाज खुरेशी, रहीम सर महेफुज सर, बरकत सरआदि उपस्थिती होते.
या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी रोटरीचे अध्यक्ष रो.नजीब पठाण,सचिव रो.प्रा. शिवशंकर पाटील, प्रोजेक्ट चेअरमन रो.इंजिनिअर अनिल फुलारी सह रो.धनंजय कोत्तावार,रो.प्रा.अनिल चवळे,रो,संतोष मद्देवाड,रो.कमलाकर सुडे,रो.श्रीधर लोहारे यांनी परिश्रम घेतले.