आजच्या महिला अबला नसून सबला आहेत – प्राचार्या रेखाताई तरडे
अहमदपूर( गोविंद काळे )पूर्वी स्त्रीयांकडे पाहण्याचा दृष्टिकोन फारच कमी दर्जाचा होता. एक वस्तू म्हणून पाहिले जायचे. पण काळानुरुप महिलांनी स्वतः ला सिध्द करत आपले अस्तित्व दाखवत आम्ही सुद्धा पुरूषांच्या खांद्यास खांदा लावून उभे होवू शकतो किंबहुना पुरूषांच्याही पुढे जाऊ शकतो म्हणजेच महिला अबला नसून सबला आहेत हे महिलांनी सिद्ध केले आहे असे प्रतिपादन भाजपाच्या महिला मोर्चा आघाडी च्या (ग्रामीण) जिल्हाध्यक्षा तथा माजी जि प सदस्या प्राचार्या रेखाताई तरडे मॅडम यांनी केले.
ते सांगवी येथील पु अहिल्यादेवी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात अध्यक्षीय समारोपात बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर संस्थेच्या समन्वयिका शिवालिका हाके, सम्राट चंद्रगुप्त मौर्य इंटरनॅशनल स्कूलच्या प्राचार्या रूथ चक्रनारायण तसेच प्राध्यापिका पद्मजा देशपांडे- कुलकर्णी, बालाघाट तंत्रनिकेतनच्या प्राध्यापिका रूपा पाटील,आरती पूणे, श्रद्धा मेनकुदळे यांच्यासह दैवशाला शिंदे, कौशल्या देवकते, मिनल गोगडे-सारोळे यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे औचित्य साधून शाळेतील व आलेल्या सर्व महिलांना शाळेच्या वतीने सन्मानीत करण्यात आले. याप्रसंगी समन्वयिका शिवालिका हाके म्हणाल्या की मुलींनी निसंकोच आपल्या सुप्तगुणांना वाव दिलं पाहिजे, आत्मविश्वासाने जगलं पाहिजे आणि हे करत असताना स्वतःच्या आत्मसन्मानाकडेही लक्ष देणे गरजेचे आहे. तर सम्राट चंद्रगुप्त मौर्य इंटरनॅशनल स्कूलच्या प्राचार्या रूथ चक्रनारायण यानीसुद्धा अतिशय प्रगल्भ विचार मांडत म्हणाले की मुलींनी आपापल्या आईला क्लोज मित्र समजून प्रत्येक गोष्ट आईशी शेअर करणे आवश्यक आहे तसेच अभ्यासाकडे दुर्लक्ष न करता घरात सुद्धा मदत करावी. यावेळी रूपा पाटील, आरती पूणे,पद्मजा कुलकर्णी यांनीही मार्गदर्शन केले.
यावेळी सध्या देशात महिलांवर अन्याय अत्याचार होत असून दररोज बातम्या येताहेत. त्यात काही मुली स्त्रिया मृत देखील झाले आहेत. त्यांना आदरांजली म्हणून मेणबत्त्या लावून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री शेख जिलानी यांनी केले तर आभार संतोष मुळे यांनी मानले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राजाराम बुर्ले,राजकुमार पनाळे, अच्यूत सुरनर, रमेश चेपूरे, संभाजी दुर्गे, तुकाराम शिंगडे, प्रदीप रेड्डी, अमोल सारोळे, गजानन फुलारी, हिदायत शेख, विश्वंभर सुरनर आदींनी परिश्रम घेतले.