शेतकऱ्यांना खरीप पीक विम्याचे त्वरित वाटप करा

शेतकऱ्यांना खरीप पीक विम्याचे त्वरित वाटप करा

मनसेचे गुरुवारी अहमदपूर तहसील समोर धरणे आंदोलन

अहमदपूर (गोविंद काळे) : शेतकऱ्यांना त्वरित पीकविमा वाटप व्हावा म्हणून व पीक विमा कंपनी चा निषेध नोंदवण्यासाठी तसेच शासनाला जागे करण्यासाठी मनसे जिल्हाध्यक्ष डॉ नरसिंह भिकाणे यांनी अहमदपूर तहसीलदारांना तहसील कार्यकायसमोर धरणे आंदोलन करणार असल्याचे निवेदन
दिले व त्वरित पीकविमा वाटप करण्याची मागनीही केली. खरीप पीक विमा कोरोनाच्या या बेरोजगारी काळात लवकर मिळणे अपेक्षित होते परंतु तब्बल दोन महिने उशीर झाला आहे त्यामुळे व्याजासाहित ही रक्कम शेतकऱ्यांना देण्यात यावी अशीही मागणी निवेदनात केली आहे.तसेच अद्याप मंडळ निहाय पीकविमा आकडेवारी जाहीर झाली नाही, ती जाहीर व्हावी अशीही मागणी केली आहे. अनेक शेतकऱ्यांचा विमा रद्द झाल्याचेही पीकविमा कंपनी चे म्हणणे आहे हे हास्यास्पद आहे.शेतचीशेत वाहून गेले व विमा नाही!एकीकडे अतिवृष्टीमुळे सरकारने शेतकऱ्यांच्या शेतीचे पंचनामें करत अनुदान वाटपही केले परंतु त्याच शेतकऱ्याला विमा कंपनी जर विमा देणार नसेल तर ही शेतकऱ्यांची मोठी थट्टा आहे.शेतकऱ्यांना सरसकट पीकविमा द्यावा तसेच उशीर झाल्यामुळे तो व्याजासाहित वाटप व्हावा व प्रत्येक शेतकऱ्याला त्याच्या पंचनाम्याची प्रत देण्यात यावी जेणेकरुन कंपनी ने पीक कापणी प्रयोग करताना आणेवारी सरासरी कशी काढली हे प्रत्येकाला लक्षात येईल या सर्व मागण्यांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना अहमदपूर तहसील समोर गुरुवारी 11 वाजता धरणे आंदोलन करणार आहे असे डॉ भिकाणे यांनी सांगितले.यावेळी तालुकाध्यक्ष डॉ मिलिंद साबळे, शहराध्यक्ष अतिष गायकवाड, तालुकाउपाध्यक्ष उत्तम मुरकुटे, गणेश शेटकर, अमोल खराबे, कार्तिक भिकाणेआदी उपस्थित होते.

About The Author