म. फुले महाविद्यालयात जागतिक महिला दिनानिमित्त आज राष्ट्रीय चर्चा सत्राचे आयोजन

म. फुले महाविद्यालयात जागतिक महिला दिनानिमित्त आज राष्ट्रीय चर्चा सत्राचे आयोजन

अहमदपूर (गोविंद काळे) : येथील महात्मा फुले महाविद्यालयात प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली समाजशास्त्र विभागाच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त उद्या ८ मार्च २०२१ रोजी महिला ‘सशक्तिकरण वास्तव आणि अपेक्षा ‘ या विषयावर (ऑनलाइन) आभासी प्रणालीच्या माध्यमातून राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे.

याबाबतचे सविस्तर वृत्त असे असे की, या राष्ट्रीय चर्चासत्राचे उद्घाटन सातवहन विद्यापीठ, वारंगल चे माजी कुलगुरू डॉ. मोहम्मद इक्बाल यांच्या हस्ते होणार आहे तर अध्यक्षस्थानी महात्मा फुले महाविद्यालयाची माजी आदर्श विद्यार्थिनी सौ.माधवी चौकटे ह्या अध्यक्षस्थान भूषविणार असून हे राष्ट्रीय चर्चासत्र दोन सत्रांमध्ये संपन्न होणार आहे. या वेळी विषयतज्ज्ञ म्हणून डॉ. अनुपमा हैदराबाद तसेच डॉ. मीनाक्षी नांदापूरकर हैदराबाद व डॉ.ललिता गादगे औरंगाबाद यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.तर स्वारातीमवि नांदेडचे कुलगुरू डॉ.उद्धव भोसले,प्र.कुलगुरू जोगेंद्रसिंह बिसेन, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य प्राचार्य डॉ. वसंत भोसले, डॉ.दीपक बच्चेवार यांच्या शुभेच्छा प्राप्त झाल्या आहेत.

तसेच राष्ट्रीय चर्चासत्राच्या समारोप कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. माधवी कवी पुणे उपस्थित राहणार असून प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांचेही मार्गदर्शन लाभणार आहे. अशी माहिती राष्ट्रीय चर्चासत्राचे संयोजक समन्वयक प्रा. डॉ. सतीश ससाने यांनी दिली.

About The Author