संत ज्ञानेश्वर विद्यालयात किशोरवयीन मुलींना मार्गदर्शन करून जागतिक महिला दिन साजरा
अहमदपूर (गोविंद काळे) : 08 मार्च रोजी संत ज्ञानेश्वर विद्यालयात जागतिक महिला दिनानिमित्त किशोरवयीन मुलींसाठी कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थासचिव तथा भाजपा महिला मोर्चा आघाडीच्या जिल्हाध्यक्षा प्राचार्या रेखाताई हाके पाटील तर प्रमुख अतिथी म्हणून ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. मनकर्णा पाटील उपस्थित होत्या.कार्यक्रमाच्या प्रारंभी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी विद्यालयातील किशोरवयीन विद्यार्थीनींना गुड टच बॅड टच,मासिक पाळीत घ्यावयाची काळजी, आहारविषयक माहिती, सकस आहार आणि पालेभाज्यांचा वापर जास्त करावा आज जर मुलींनी आरोग्याची काळजी घेतली तर भविष्यात कोणतीही समस्या येत नाही. आजच्या मुली उद्याच्या माता आहेत त्या सशक्त असल्या पाहिजेत असे मत डॉ.मनकर्णा पाटील यांनी व्यक्त केले.
तसेच अध्यक्षीय समारोप प्रसंगी प्राचार्या रेखाताई तरडे-हाके यांनी आपल्या मार्गदर्शनातून मुलींचे आरोग्य किती महत्त्वाचे आहे आणि मुलींनी प्रसंगी दुर्गा झाली पाहिजेत, आपणच आपले संरक्षण केले पाहिजे. त्यासाठी कराटे आणि मैदानी खेळ खेळले पाहिजेत. मोबाईलचा आणि इंटरनेट चा वापर चांगल्या कामासाठीच करावा. टीव्हीवरील प्रोग्राम काय पहायचे आणि काय नाही यावर स्वतः बंधन घातले पाहिजेत. असे सविस्तर मार्गदर्शन केले. याप्रसंगी भाजपा महिला जिल्हाध्यक्षा प्राचार्या रेखाताई तरडे-हाके यांनी महिला दिनानिमित्त उपस्थित महिलांचा पुष्पगुच्छ आणि पेन देऊन सत्कार केला.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक आशा रोडगे यांनी केले तोवर मिना यांनी आपली स्वरचितकविता सादर केली. सुत्रसंचलन संगीता आबंदे यांनी केले तर आभार शारदा तिरुके यांनी मानले आणि पसायदानाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.