माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांच्या निवडीचे मसाप तर्फे स्वागत

माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांच्या निवडीचे मसाप तर्फे स्वागत

अहमदपूर (गोविंद काळे) : वर्धा येथे होणारे 96 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन च्या अध्यक्षपदी सुप्रसिद्ध साहित्यिक तथा माझी न्यायाधीश नरेंद्र चपळगावकर यांची निवड झाल्याने त्यांच्या निवडीचे मराठवाडा साहित्य परिषद शाखा अहमदपूरच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले. येथील मराठवाडा साहित्य परिषदेच्या कार्यकारणीची व्यापक बैठक मसा प चे अध्यक्ष सत्यनारायण काळे यांच्या अध्यक्षतेखाली होऊन त्यात संमेलनाचे अध्यक्ष माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांच्या अभिनंदनाचा ठराव मंजूर करण्यात आला. यावेळी सत्यनारायण काळे यांनी माजी न्यायमूर्ती चपळगावकर यांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वावर आणि त्यांच्या साहित्यावर प्रकाश टाकला. या बैठकीला सेवानिवृत्त प्रा .भूषण जोरगूलवार, सेवानिवृत्त प्रा. निशिकांत देशपांडे, कवी राजसाहेब कदम, उदयकुमार जोशी, सेवानिवृत्त प्रा. द मा माने, मोहीब कादरी यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती. प्रास्ताविक राम तत्तापुरे यांनी सूत्रसंचलन कवि अनिल चवळे यांनी आभार जिलानी शेख यांनी मांनले.

About The Author