बालाघाट तंत्रनिकेतन मध्ये महाडीबीटी शिष्यवृत्ती कार्यशाळा संपन्न
अहमदपूर (गोविंद काळे) : श्री गणेश शिक्षण प्रसारक मंडळ संचलित बालाघाट तंत्रनिकेतन तथा औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये महाडीबीटी शिष्यवृत्ती योजने संदर्भात कार्यशाळा घेण्यात आली. महाडीबीटी पोर्टल वर येणाऱ्या विविध योजनेबाबत अर्ज सादर कसा करावा, मोबाईल नंबर कसा अपडेट करावा, शिष्यवृत्ती अर्ज सादर करताना येणाऱ्या अडचणी काय असतात ? रजिस्ट्रेशन करताना येणाऱ्या अडचणी व त्याचे निराकरण कसे करावे याबाबत तसेच शिष्यवृत्ती अर्ज सादर करताना डॉक्युमेंट अपलोड करतेवेळी कशाप्रकारे डॉक्युमेंट अपलोड करावेत याचे प्रात्यक्षिक व माहिती देण्यात आली. अर्ज सादर करताना विद्यार्थ्यांनी चालू वर्षाचे उत्पन्न प्रमाणपत्र, नॅशनॅलिटी,जात प्रमाणपत्र, मागील वर्षाचे मार्कमेमो, रेशन कार्ड, आधार कार्ड, बँकेमध्ये मोबाईल व आधार लिंक असणे, बोनाफाईड प्रमाणपत्र शाळा सोडल्याचा दाखला इत्यादी डॉक्युमेंट असल्याशिवाय आपला अर्ज मंजूर होऊ शकत नाही अर्ज मंजूर लवकर होण्यासाठी योग्य प्रकारे योग्य डॉक्युमेंट्स स्कॅन करून आपला अर्ज सबमिट करावा असे मत समाज कल्याण विभागाचे अहमदपूर तालुक्याचे तालुका समन्वयक अमोल मुळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्राचार्य स्वप्निल नागरगोजे तसेच व्यासपीठावर सिद्राम मासुळे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार सतीश केंद्रे यांनी मानले तर प्रास्ताविक सिद्राम मासुळे यांनी केले.