डॉ.राधाकृष्णन प्राथमिक विद्यालयात कथाकथन व बालकविता वाचनाचा कार्यक्रम
उदगीर (एल.पी.उगीले) : येथील डॉ.राधाकृष्णन प्राथमिक विद्यालयात मुंबई चे बालसाहित्यिक व साने गुरुजी कथामालेचे प्रमुख रमेश तांबे व बालकांसाठी अडुसष्ट पुस्तकं लिहिणाऱ्या कोल्हापूरच्या बालसाहित्यिका, निलम मानगावे यांच्या विनोदी कथा कथन व बहारदार काव्य वाचनाचा कार्यक्रम संपन्न झाला.
उभय साहित्यिकांनी प्रभावी व सअभिनय कथा सादर करुन मुलांना भरपूर हसवून त्यांची मनं जिंकली . त्यांच्या विनोदी कविता ऐकताना मुले खळखळून हसत होती.
कार्यक्रमाचे अध्यक्षपद राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक तथा कवी विश्वनाथ मुडपे यानी भूषविले.व्यासपीठावर संस्था सचिव देविदास नादरगे, विश्वनाथ माळेवाडीकर , वैजनाथ पंचगल्ले, मु.अ.दत्तात्र्य कुंडगिरे उपस्थित होते. तत्पूर्वी क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन झाल्यानंतर शिक्षक व विद्यार्थ्यांनी प्रमुख पाहुण्यांचा सत्कार केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक लेखक रमाकांत बनशेळकीकर यानी केले.सूत्र संचालन वर्षाताई पाटील यानी केले. प्रशांत पांचाळ यांच्या आभार प्रदर्शनानंतर कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शशिकांत पाटील, मनोरमा ताई तेलंग
,झांबरे गुरुजींनी परिश्रम घेतले.