पाण्याच्या टाकीचे बंद पडलेले काम तात्काळ चालू करा – मनसे

पाण्याच्या टाकीचे बंद पडलेले काम तात्काळ चालू करा - मनसे

जळकोट (एल.पी.उगीले) : जळकोट तालुक्यातील मौजे मंगरूळ येथील पाण्याच्या टाकीचे चालु असलेले काम मागील दोन ते तीन महिन्यापासून बंद पडले आहे.

मंगरूळ या गावात भविष्यात पाण्याची टंचाई भासू नये, याकरिता करीत असलेल्या पाण्याच्या टाकीचे काम उन्हाळ्यापर्यंत पूर्ण होणे आवश्यक आहे. त्यामुळे मंगरूळ येथील जनतेच्या उन्हाळ्यात पाण्याचा प्रश्न निर्माण होणार नाही, पण त्या गुत्तेदाराच्या निष्काळजीपणामुळे मागील दोन ते तीन महिन्यापासून सदरील काम बंद पडले आहे, यामुळे हे काम पुढील उन्हाळ्यापर्यंत पूर्ण होणार की नाही?या संदर्भात काही लोकांना उगीचच शंका निर्माण होऊ लागली आहे.

संबंधितांनी याकडे लक्ष घालून या बंद पडलेल्या कामाला तात्काळ चालू करावे, असे आदेश देण्यात यावेत जेणेकरून मंगरूळ या गावातील गावकऱ्यांचा पाण्याचा प्रश्न थोडासा दूर होईल.

अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना या विरोधातील आंदोलन हाती घेईल, याची नोंद घ्यावी. अशा प्रकारचे निवेदन तहसीलदार व गटविकास अधिकारी पंचायत समिती यांना देण्यात आले. त्याप्रसंगी शेतकरी सेना तालुका अध्यक्ष महेश देशमुख, विद्यार्थी सेना तालुका अध्यक्ष शुभम चंदनशिवे, विद्यार्थी सेना युनिट शाखाध्यक्ष प्रशांत पाटील, महाराष्ट्र सैनिक आकाश हिंगमिरे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!