कोश्यारी, त्रीवेदी यांच्या वादग्रस्त वक्तव्याचा शिवसेनेच्या वतीने जाहीर निषेध
उदगीर (एल.पी.उगीले) : उदगीर तालुका शिवसेनेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार, शिवसेना नेते चंद्रकांत खैरे , मराठवाडा समन्वयक विश्वनाथ नेरुरकर , शिवसेना जिल्हाप्रमुख बालाजी रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली छत्रपती शिवाजी महाराज हे जुन्या काळातील आदर्श आहेत, तर आधुनिक युगात डाॕ. नितीन गडकरी हे आदर्श आहेत, असे वादग्रस्त व अवमानास्पद वक्तव्य करत भगतसिंग कोश्यारी यांनी पुन्हा आपली जीभ नरडीत ढकलली तर दिल्ली दरबारी न्युज चॅनलवर बोलताना भाजपा खासदार सुधांशू त्रीवेदी यानी औरंगजेब याची छत्रपती शिवाजी महाराजांनी पाच वेळा माफी मागितली. असे वक्तव्य करून देशाची अखंडता, शिवरायांच्या प्रती असलेला आदर कमी करण्याचा प्रयत्न केला. छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगड जाती धर्मातील लोकांना एकत्र आणून स्वराज्याची स्थापना केली, त्यांचा लोकाभिमुख कारभार जगाने जोपासला, अशा आदर्श छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल भाजपा सरकार मधील संविधानीक पदावर असलेल्या नालायक लोकांनी असा निच प्रयत्न केला आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे काल, आज आणि उद्याही कायमच आमचे आदर्श राहातील. हे पक्षपाती राजकीय राज्यपाल कोश्यारी आणि तो भारतीय जनता पार्टीचा खासदार सुधांशू त्रिवेदी काय बोलत आहेत?, त्यांच त्यांना तर कळत का?, त्यांच्या या अवमानस्पद वक्तव्याचा शिवसेना उदगीर तालुक्याच्या वतीने शिवसेना तालुका प्रमुख कैलास पाटील यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी महाराज चौकात जाहीर निषेध नोंदवुन कोश्यारी, त्रिवेदी यांच्या प्रतिमेला जोडे मारुन आंदोलन करण्यात आले. शिवसैनिकांनी यावेळी जोडे मारुन कोश्यारीच्या प्रतिमेला काळे फासून त्यांच्या प्रतिमेला जाळून कोश्यारी हटाव, महाराष्ट्र बचाव, अशा घोषणा देऊन निषेध नोंदवण्यात आला,यावेळी शिवसैनिकांच्या विविध घोषणांनी परीसर दणाणुन गेला होता. यावेळी उपजिल्हाप्रमुख अंकुश अण्णा कोनाळे, तालुका प्रमुख कैलास पाटील, तालुका संघटक बालाजी पुरी, शहर प्रमुख मुन्ना पांचाळ, युवा सेना जिल्हा समन्वयक शैलेश वडगावे, व्यंकट अण्णा साबने, अरुण भाई बिरादार, शिवकांत चटनाळे, बन्सीलाल अण्णा कांबळे, सचिन साबने, गोविंद अण्णा बेंबडे, विष्णुकांत चिंतलवार, शरद भैय्या सावरे, सोम व्दासे, श्रीनिवास आकाशे, मिथुन वाडीकर, महेश फुले, राम बिरादार, चंद्रकांत सांगळे, मोईन पटेल इत्यादी उपस्थित होते.