पॉश मशीन चालत नाही ऑफ लाईन धान्य देण्याची व्यवस्था करण्याची मागणी

पॉश मशीन चालत नाही ऑफ लाईन धान्य देण्याची व्यवस्था करण्याची मागणी

वाढवणा बु (हुकूमत शेख) : उदगीर तालुक्यातील वाढवणा बु येथील गावात चार रास्त भाव दुकान असुन दर महिन्याच्या महिना पुरवठा विभागाकडून अन्नसुरक्षा योजनेतील व अंतोदय, केशरी शिधाधारकांना गहू ,तांदुळ प्रति युनिट पाच किलो, दोन किलो गहू 2 रुपये प्रति किलो व तांदुळ 3किलो 3 रुपये प्रति किलो दराने पुरवठा होतो, मात्र ऑनलाईन पद्धतीने पॉश मशीन वर अंगठा लाऊनच स्वस्त धान्य दिले जात आहे. या मुळे भ्रष्टाचाराला आळा बसेल या हेतूने शासनाने सर्व रास्त भाव दुकानात पॉश मशीन देऊन अंगठा घेतल्या शिवाय धान्य देण्यात येऊ नये, अशी सूचना व ताकीद दुकानदारांना दिल्यामुळे अंगठा लावल्या शिवाय धान्य दिले जात नाही. परंतु कांहीं ठिकाणी पॉश मशीन चालु होत नाहीत, अंगठा येत नसल्याने गोरगरिबांचे दिवस भराचे काम वाया जात आहे.

लाईनला थांबून दिवस जात असुन देखील ऑनलाईन पॉश मशीन आता चालु होईल, तेव्हा चालु होईल. हया आशेत दिवस जात असुन “मुर्गी आठेनेकी मसाला बाराने काl “अशी गत शिधाधारकांची झाली आहे. स्वस्त धान्य ऑनलाईन ऐवजी ऑफलाईन देण्यात यावे. जेव्हा ऑनलाईन चांगल्या प्रकारे पॉश मशीन चालेल त्या दिवशी आंगठे करू अशी चर्चा जोरात चालु असुन वाढवणा प्रतिनिधी हुकूमत शेख यांनी चार दुकानदाराशी चर्चा केली असता दुकानदार रंधवा कारभारी, अब्दुल डांगे, मुक्ता कानूरे, विठ्ठल नागपूर्णे यांनी सांगितले, सकाळी थोडा वेळ पॉश मशीन चालु होते. दोन चार जणांचा अंगठा घेतला की नंतर काय नेट प्रॉब्लेम होतो. मशीन वर अंगठा येत नाही, या मुळे आम्हाला पण ताटकळत बसावे लागत आहे. धान्य दुकानात आहे. काही सुशिक्षित शिधाधारक धान्य द्या म्हणुन मागे लागत आहेत. आम्हाला सर्वांनाच धान्य द्यायचे आहे. मात्र पॉश मशीन चालत नाही, वरूनच प्रॉब्लम आहे. खरोखरच गरीब मजूरदरांची परेशानी होत आहे, काम बुडत आहे. आम्हाला दिसत आहे मात्र शासनाने आम्हाला ऑफलाईन धान्य न देण्याची अट घातली आहे. दिवाळीचा शिधा जसा शासनाने ऑफलाईन वाटप करण्याची परवानगी दिली तशी धान्य वाटपाला दिली तरी आम्ही सही घेउन धान्य देऊ, नंतर शिधाधारकांकडून सही घेऊ मात्र शासन आम्ही ऑफलाईन मध्ये भ्रष्टाचार होतोय या हेतूने शासन ऑनलाईन पॉश मशीन वर अंगठा घेतल्या शिवाय धान्य द्यावयाचे नाही, असा जीआर काढले आहे. म्हणून आम्हाला ऑफलाईन धान्य देता येत नाही, व शिधाधारकाने अंगठा दिला तर पुढील महिन्याचा धान्य पुरवठा विभागाकडून मिळतो. अशी माहिती दुकानदारांनी आमचे प्रतिनिधी हुकूमत शेख यांना दिली.

अनेक शिधाधारकांशी चर्चा केली असता शिधाधारक म्हणत आहेत धान्य आमच्याच नावाचे आहे दुकानात सी सी टीव्ही कॅमेरा लावा. म्हणजे शिधाधारकांची ओळख व धान्य घेत असलेली छबी त्याच्यात दिसेल, ज्या वेळेस ऑनलाईन चालु होईल, आम्ही पॉश मशीन वर अंगठा लावू. आमचा वेळ वाचेल, शासनाने एक तरी सी सी टीव्ही कॅमेरा बसवा किंवा ऑफलाईन धान्य देण्याची तरतूद करा. अशी मागणी शिधाधारक करत आहेत.

About The Author