सुभाष राठोड यांनी स्वखर्चातून करून दिला टीकाराम तांड्याचा रस्ता

सुभाष राठोड यांनी स्वखर्चातून करून दिला टीकाराम तांड्याचा रस्ता

उदगीर (एल.पी.उगीले) : स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतरही उदगीर तालुक्यातील भिमा तांडा ते टिकाराम तांडा येथे पक्का किंवा कच्चा असा कोणताही रस्ता नव्हता . आनेक वेळा तंड्याच्या नागरीकांनी रस्ता करावे, या मागणी साठी सत्तेची फळे चाखणाऱ्या सरपंच, पंचायत समिती सदस्य,या लोकप्रतिनिधीकडे रस्त्यासाठी नागरिकांनी मागणी केली, परंतू 70 वर्षांपासून अनेक सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पंचायत समिती सदस्य होऊन गेले. पण टीकाराम तांडा रस्त्यापासून वंचित होता, याच रस्त्याचा अजेंडा नागरिकांसमोर ठेवून गावातील अनेक पुढाऱ्यांनी निवडणूक जिंकली. कोणी 10 वर्ष सत्तेची फळे चाखली तर कोणी पाच वर्षे सत्तेची फळे चाखली खोटी आश्वासने देत 70 वर्षाचा काळ पुढाऱ्यांने लोटला पुढाऱ्यांने केलेली दिशाभूल नागरिकांना लक्षात आली पुन्हा नागरिकांनी सरकार दरबारी आवाज उठवला ,आंदोलने केली .परंतू शासन प्रशासनानी कांही दखल घेतली नाही .रस्ता नसल्याने विद्यार्थ्यांना ,रुग्णांना व नाकगरीकांना मोठा ञास सहन करावा लागत होता अखेर नागरिकांचा वाली म्हणून सुभाष मुन्ना राठोड यांनी 21 नोव्हेंबर रोज सोमवारी तब्बल दोन लाख रुपये खर्च करत जेसीबी ,डंपरच्या साह्याने भिमा तांडा ते टिकाराम तांडा दरम्यान मुरुम टाकून रस्ता करून दिला मागील 70 वर्षांपासून पासून कोणीही रस्त्याचे काम करून दिले नाही परंतू सुभाष मुन्ना राठोड यांनी रस्त्याचे काम करून दिल्यामुळे टीकाराम तांडा व परिसरातील तांड्यातील नागरिकांकडून सुभाष राठोड यांचे कौतूक होत आहे .

About The Author