महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयाचे ॲथलेटिक्स स्पर्धेत घवघवीत यश
उदगीर (एल.पी.उगीले) : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड अंतर्गत सायन्स कॉलेज, नांदेड येथे आंतर विभागीय ॲथलेटिक्स स्पर्धा दिनांक 18 व 19 नोव्हेंबर 2022 रोजी संपन्न झाल्या. या स्पर्धेमध्ये महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयाच्या खेळाडूंना 2 – सुवर्ण, 11 – रौप्य व 5 कांस्य पदके पटकावून, ‘ब’ विभागाचे प्रतिनिधित्व केले आहे. विजेते महिला खेळाडू विद्यापीठात अनुक्रमे तनिषा केंद्रे – 20 कि.मी. वॉकिंग- प्रथम, पूजा टिंगरे- 800 मीटर धावणे- द्वितीय, पुष्पा सूर्यवंशी- 400 मीटर धावणे- तृतीय, प्रणिता विभुते- 100 मीटर धावणे- तृतीय, 4 x 400 मीटर रिले संघ व 4 x 400 मीटर रिले संघ – द्वितीय या विजेत्या संघामध्ये प्रणिता विभुते, अनुराधा काळे, पुष्पा सूर्यवंशी, पूजा टिंगरे, तनिषा केंद्रे, प्रतिभा तेलंगे तर विजेत्या पुरुष खेळाडूमध्ये हंसराज ढगे-1500 मीटर धावणे- प्रथम, 5000 मीटर धावणे- तृतीय, गणेश सुरवसे- 10000 मीटर धावणे- तृतीय, मुकेश मुंडे- थाळीफेक- तृतीय, 4 x 400 मीटर रिले संघ- द्वितीय या विजेत्या संघामध्ये अर्जुन पिंपळे, नारायण शेळके या खेळाडूंचा समावेश होता. या विजयी खेळाडूंना क्रीडा संचालक प्रा. सतीष मुंढे, प्रा. रोहन येनाडले यांनी मार्गदर्शन केले. त्याबद्दल सर्व विजेत्या खेळाडूंचे महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मल्लिकार्जुन मानकरी, उपाध्यक्ष डॉ.रेखा रेड्डी आणि अॅड प्रकाश तोंडारे, सचिव रामचंद्र तिरुके, सहसचिव डॉ.रामप्रसाद लखोटिया आणि अॅड.सूर्यकांत पाटील, कोषाध्यक्ष भालचंद्र चाकूरकर तसेच सर्व संस्था सदस्य, प्राचार्य डॉ. बी.एम.संदीकर, उपप्राचार्य डॉ.आर.के मस्के यांनी अभिनंदन केले.