दारिद्र्यात जगणाऱ्या व्यक्तीला पुनर्जीवन देण्याची सेवा ही ईश्वर सेवेपेक्षा महान – रामचंद्र तिरुके

दारिद्र्यात जगणाऱ्या व्यक्तीला पुनर्जीवन देण्याची सेवा ही ईश्वर सेवेपेक्षा महान - रामचंद्र तिरुके

लोहारा (एल.पी.उगीले) : येथे गरिबीत जीवन जगणाऱ्या आणि दुर्धर आजाराने पीडित नागरिकांवर अत्यंत महागड्या शस्त्रक्रिया मोफत झाल्यानंतर जीवन जगत असलेल्या नवजीवनींचा हृद्य सत्कार करण्यात केला.25 वर्षांपूर्वी सुरू केलेला आरोग्य सेवेचा हा यज्ञ अखंडितपणे सुरू असून आत्तापर्यंत सुमारे साडेतीन हजार रुग्णांची मोफत शस्त्रक्रिया करून आणण्यात माझ्यासारख्याला यश मिळालं आहे. असे विचार आरोग्य दूत म्हणून ओळखले जाणारे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके यांनी व्यक्त केले.या कामाचं आत्मिक समाधान शब्दात वर्णन करण्यापलीकडचं आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले की,रुग्णसेवेचं राजकीय भांडवल मी कधीच केलं नाही. फक्त गरजू लोकांपर्यंत हा विषय पोचावा, या उदात्त हेतुने लोहारा येथील सत्कार आयोजित केला होता. अंकुश वाघमारे,मधुकर करडखेले,भारतबाई कांबळे, हबीब सय्यद,निवृत्ती कांबळे, विमलबाई धनबा आदींवर अत्यंत महागड्या पण मोफत शस्त्रक्रिया झाल्या.काहींना गत 22 वर्षापासून व्याधीमुक्त जीवन जगायला मिळत असल्यामुळे त्या सर्वांचा हृद्य सत्कार केला.यावेळी प्रा.पंडित सूर्यवंशी,बालाजी रक्षाळे, महिपाल पाटील चंदू भातमोडे, विविध विकास सहकारी सोसायटीचे चेअरमन शेषेराव हेळगे,शाम सोनटक्के,
रतन कस्तुरे,संतोष कांबळे आदी उपस्थित होते.

About The Author