लहूजी साळवे यांचा विचार तळागाळातील लोकांपर्यंत पोहचवा – डॉ.आर. एस. देवणीकर
देवणी (प्रतिनिधी ) : देवणी येथील साठे नगर मध्ये मातंग अस्मिता संघर्ष सेना या संघटनाच्या वतीने देवणी तालुकास्तरीय क्रांतीगुरू लहूजी राघोजी साळवे यांच्या २२८ व्या जयंतीनिमित्त समाजभूषण, उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार विविध क्षेत्रातील नामवंत व्यक्ती मास संघटनेच्या माध्यमातून अनेक व्यक्तींना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले,या आयोजित कार्यक्रमात “लहूजी साळवे यांच्या विचारांवर महाराष्ट्रातील प्रसिद्ध व्याख्याते समाजभूषण पुरस्काराने सन्मानित प्रमुख वक्ते मनून बोलताना डॉ आर एस देवणीकर,यांनी सांगितले की,क्रांतीगुरू लहूजी राघोजी साळवे यांनी” जगेन तर देशासाठी व मरेन तर देशासाठी ” अशी शपथ घेतली व मी भारतातला ब्रिटिशांच्या गुलामीतून मुक्त केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, भारतीय स्वातंत्र्यासाठी आयुष्भर लग्न करणार नाही अशी शपथ घेतली.
सन १८२२ मध्ये ब्रिटिश विरुद्ध सशत्र लढा उभारण्यासाठी क्रांतीगुरू लहूजी साळवे यांनी पुण्यात गंजपेठेत सैन प्रशिक्षण केंद्र सुरू केली आणि त्यात वासुदेव बळवंत फडके, तात्या टोपे,बाळ गंगाधर टिळक,क्रांतीबा ज्योतिराव फुले सह शेकडो शसस्त्र क्रांतिकारकांना प्रशिक्षण देऊन भारतीय स्वातंत्र्याच्या लढाई यशस्वी केली. मनून लहूजी साळवे यांना भारतीय स्वातंत्र्या लढ्याचा पाया रचला असे संबोधले जाते. याशिवाय क्रांतीसूर्य ज्योतिराव फुले व क्रांतिज्योती सावित्री फुले यांनी १८४८मध्ये पुणे येथे देशात सर्व प्रथम मुलींची शाळा सुरू केली. मुलीच्या शाळेला संरक्षण दिले मनून भारतात फुले दाम्पत्य यांनी शैक्षणिक व सामाजिक क्रांती घडवून आणली असे प्रतिपादन केले. या कार्यक्रमाचे अध्यक्षा सौ, डॉ, कर्तीताई घोरपडे नगराध्यक्षा देवणी प्रमुख मार्गदर्शक राजाभाई सुर्यवंशी मास संघटनेचे संस्थापकअध्यक्ष, प्रमुख अतिथी डॉ,आर एस देवणीकर प्रमुख वक्ते, नितीनदादा तलवारे मास मराठवाडा अध्यक्ष,अजंली डोंगरे महाराष्ट्र अध्यक्ष, पवार जिल्हाध्यक्ष ,उषाताई भालेराव महिला जिल्हाध्यक्ष लातुर, अभंग उर्फ फकिरा सुर्यवंशी जिल्हा उपाध्यक्ष, गोकुळ दतंराव जिल्हा संपर्क प्रमुख, उत्तमजी फड जिल्हासचिव, नारायण सोमवारे नांदेड जिल्हा सचिव,शिवाभाऊ कांबळे युवा नेते ,किरण सुर्यवंशी तालुकाध्यक्ष उदगिर,जितेशभाई रणदिवे विळेगावकर देवणी तालुकाध्यक्ष, सत्यम कांबळे शहराध्यक्ष,रजनिकांत सुर्यवंशी ज्ञानसेतु, प्रा,रतन सुर्यवंशी,अनिल मोतिरावे, श्रीहरी सुर्यवंशी, वैभव कांबळे, दिपक बेळकोणे,आंंबा पाटील,प्रा,अनिल इंगोले बुदरे, , देविदास पतंगे, जमिरपाशा मोमीन,जावेद तांबोळी, प्रविण बेळे, अमरदिप बोरे,खैरोनिसा शेख, सत्यभामा घोलपे,अमित सुर्यवंशी,नदिम मिर्झा, मोहन रणदिवे, दत्ता रणदिवे,दयासागर रणदिवे प्रशांत रणदिवे , दयानंद रणदिवे,दिलीप सुर्यवंशी आंबेगावकर , प्रभु सुर्यवंशी , मारोती सुर्यवंशी , पत्रकार रणदिवे लक्ष्मण आदि मान्यवर उपस्थित होते.