सम्राट चंद्रगुप्त मौर्य इंटरनॅश्नल स्कूल मध्ये इंदिरा गांधी जयंती उत्साहात साजरी

सम्राट चंद्रगुप्त मौर्य इंटरनॅश्नल स्कूल मध्ये इंदिरा गांधी जयंती उत्साहात साजरी

अहमदपूर (गोविंद काळे) : तालुक्यातील सम्राट चंद्रगुप्त मौर्य इंटरनॅश्नल स्कूल, रुद्धा ता. अहमदपूर येथे दि. १९/११/२०२२ रोजी सम्राट चंद्रगुप्त मौर्य इंटरनॅश्नल स्कूल मध्ये इंदिरा गांधी यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून श्री. गणेश शिक्षण प्रसारक मंडळाच्या अंतर्गत असलेल्या सम्राट चंद्रगुप्त मौर्य इंटरनॅश्नल स्कूल चे संचालक श्री.कुलदीप हाके पाटील व संचालिका सौ. शिवालिका कुलदीप हाके पाटील उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीस अध्यक्षांच्या हस्ते इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तसेच या कार्यक्रमामध्ये विविध वर्गातील विद्यार्थ्यांनी इंदिरा गांधी यांच्या जीवनावर मनोगत व्यक्त केले. या जयंतीच्या कार्यक्रमाचे प्रात्साविक प्रा.भरत कानवटे व संचालन प्रा. संभाजी सांगळे यांनी केले. या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रा. प्राचार्या सौ. रुथ चक्रनारायण यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील शिक्षक प्रा. शुभम पोले, प्रा. ऋतिक पोले, प्रा. शेख मोसिन, प्रा. शुभांगी सूर्यवंशी, प्रा. हीना कुल्लुरकर, प्रा. ज्योत्सना स्वामी, प्रा. स्नेहा ओझा, प्रा. अंजली बोधनकर व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी मोलाचे योगदान दिले.

About The Author

You may have missed

error: Content is protected !!