जिल्ह्यातील 710 पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी

जिल्ह्यातील 710 पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी

लातूर (प्रतिनिधी) : कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी अविरत कर्तव्यावर असणाऱ्या पोलिसांच्या आरोग्याची समस्या लक्षात घेवून शहरातील 710 पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. पोलीस अधीक्षक कार्यालय आणि जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयामार्फत ही मोहीम राबविण्यात आली.

पोलिस अधीक्षक सोमय मुंडे आणि जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. लक्ष्मण देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली 15 नोव्हेंबर ते 19 नोव्हेंबर या कालावधीत राबविण्यात आलेल्या या मोहिमेत पोलिस अधिकारी व कर्मचारी यांची आरोग्य व रक्त तपासणी करण्यात आली. या मोहीमेच्या समन्वयाची जबाबदारी सहायक पोलीस निरीक्षक राज नरवटे, जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयातील डॉ. आनंद कलमे व अमोल झेंडे यांनी सांभाळली.

जिल्ह्यातील 710 पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी

मोहीमेसाठी आरबीएसके पथकातील डॉ. श्रीमती राजुरकर, डॉ. श्रीमती आळंगे, डॉ. सचिन व्यवहारे, श्रीमती गायकवाड, विष्णू कदम व त्यांचे सहकारी व जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयातील राजाभाऊ घुले, प्रकाश बेंबरे, दिपक पवार, कैलास स्वामी, कपिल सर्जे, श्रीमती शिडोळे यांनी सहकार्य केले.

About The Author

error: Content is protected !!