राज्यपाल कोशारी विरोधात आंदोलन,प्रतिमेला जोडे मारले

राज्यपाल कोशारी विरोधात आंदोलन,प्रतिमेला जोडे मारले

उदगीर (एल.पी.उगीले) : राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोशारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल एकेरी शब्द वापरून तमाम शिवभक्तांचा अवमान केल्याबद्दल, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या वतीने कोशारी यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करून जाहीर निषेध करण्यात आला.

या प्रसंगी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष सुनील केंद्रे यांचा मार्गदर्शनाखाली उदगीर तालुक्यातील कुमठा खु. येथे राज्यपाल यांच्या पुतळ्याचे दहन व त्यांच्या प्रतीमेस चपलांची माळ घालून जोडे मारो आंदोलन करून जाहीर निषेध करण्यात आले, या राज्यपालला महाराष्ट्र राज्यातुन हकालपट्टी करा, अन्यथा इतिहास मधे नोंद होईल की महाराष्ट्र चां राज्यपाल ना आपमनित करून हकालपट्टी केली, असे न घडण्याआधी यांना महाराष्ट्र बाहेर काढा , अशा घोषणा देण्यात आल्या, या वेळी उपसरपंच ज्ञानेश्वर पाटील, अर्जुन पाटील,अतुल केंद्रे, सचिन शिंदे,बबन सुरवसे, सुधाकर मामा, वैजनाथ डिगोळे, तुळशीदास पाटील, रामदास जाधव,माधव बिरादार,सलिम अत्तार, संतोष रणक्षेत्रे, बबन तलवारे, मनोहर बिडवे,प्रशांत बिरादार, इ कार्यकर्ते सह गावकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

About The Author