महात्मा फुले महाविद्यालयाच्या मुलींंचा संघ प्रथम तर मुलांचा संघ द्वितीय येऊन रस्सीखेच मध्ये मारली बाजी
अहमदपूर (गोविंद काळे) : येथील महात्मा फुले महाविद्यालयात स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड च्या सेंट्रल झोन रस्सीखेच स्पर्धा नुकत्याच पार पडल्या, या स्पर्धेमध्ये महात्मा फुले महाविद्यालयाच्या मुलींच्या टीमने प्रथम तर मुलांच्या टीमने द्वितीय क्रमांक पटकवून विद्यापीठ परिक्षेत्रात क्रीडा क्षेत्रांमध्ये आपले वर्चस्व पुन्हा सिद्ध करून महाविद्यालयाचा दबदबा कायम राखला. याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांच्या कुशल नेतृत्वातील तसेच क्रीडा संचालक प्रोफेसर डॉ. अभिजीत मोरे यांच्या मार्गदर्शनात महाविद्यालयाच्या मुलींच्या संघाने यशवंत महाविद्यालय नांदेड च्या संघाचा पराभव करून अटीतटीच्या झालेल्या रस्सीखेच या क्रीडा प्रकारात प्रथम क्रमांक प्राप्त केला, तसेच मुलाच्या संघाने इंदिरा गांधी महाविद्यालय नांदेडच्या संघाचा पराभव करून द्वितीय क्रमांक प्राप्त करून महाविद्यालयाचा लौकिक वाढविला.
मुलींच्या संघामध्ये शेख जुफिशा, शिंदे प्रिया, गायकवाड महानंदा, नागरगोजे वैष्णवी, नागरगोजे रेणुका, राठोड कविता, गायकवाड अस्मिता, गुट्टे कांचन, राठोड अश्विनी, नरवटे वर्षाराणी, बडगिरे वैष्णवी आदींचा समावेश होता. तर मुलाच्या संघामध्ये साळवे अनुराग, कांबळे संघरत्न, सावंत रोहन, सुरनर काकनाजी, दोडे करणसिंग, माने बुद्धभूषण , सोमवंशी, ललित मुंडे, अतिनंद भालेराव स्वप्नील या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे तसेच, मार्गदर्शक क्रीडा विभागाचे संचालक प्रोफेसर डॉ. अभिजीत मोरे यांचे किसान शिक्षण प्रसारक मंडळ उदगीरचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, सहसचिव, कोषाध्यक्ष व सर्व पदाधिकाऱ्यांनी तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांनी व उपप्राचार्य डॉ.दुर्गादास चौधरी यांच्यासह सर्व प्राध्यापक, कार्यालयीन कर्मचारी व विद्यार्थ्यांनी अभिनंदन करून पुढील क्रीडा स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.